मुंबईत आज आणि उद्या कोरोना लसीकरण स्थगित

मिलिंद तांबे
Sunday, 17 January 2021

मुंबईत रविवारी म्हणजेच 17 जानेवारी 2021 आणि सोमवारी 18 जानेवारी 2021 असे दोन दिवस कोविड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे.

मुंबईः कोविड 19 लसीकरण मोहिमेची शनिवारी अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. शनिवारी तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी सरकारनं दिली होती. 

दरम्यान यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवारी म्हणजेच 17 जानेवारी 2021 आणि सोमवारी 18 जानेवारी 2021 असे दोन दिवस कोविड 19 लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे.  कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यात शनिवारी जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे 18 हजार 338 हून  अधिक (सुमारे 64 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा- भिवंडीतील सोनाळे गावात दोन गटात हाणामारी; निवडणुकीदरम्यान प्रकार

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona vaccination suspension Mumbai today and tomorrow


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccination suspension Mumbai today and tomorrow