बूस्टर डोसबाबत कोरोना टास्क फोर्समधील विविध तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे | vaccination booster dose update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

बूस्टर डोसबाबत कोरोना टास्क फोर्समधील विविध तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे

मुंबई : कोरोनाच्या दोन्ही डोसनंतर (vaccination two dose) आता तिसऱ्या बूस्टर डोसची (third booster dose) आवश्यकता असल्याची चर्चा सुरू आहे. तूर्तास बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचे आयसीएमआरकडून (ICMR) स्पष्ट करण्यात आले आहे; मात्र याबाबत राज्य कोरोना टास्क फोर्समधील (corona task force) विविध तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.
आयसीएमआरकडून बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचे विधान येणे, हे चुकीचे असल्याचे कोरोनाविषयक समितीचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे (dr subhash salunkhe) यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: मुरबाड : बारवी धरण प्रकल्पग्रस्त अजूनही सुविधांपासून वंचित

पहिल्या डोसनंतर विहित कालावधीत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कारण अद्याप अनेक जणांनी दुसरा डोस घेतला नाही. अजूनही गंभीर सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले.
कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, रुग्णसंख्या कमी होत असताना बूस्टर डोसबाबत वैज्ञानिक अधिष्ठान नसल्याचे आयसीएमआरचे म्हणणे आहे.

मात्र हा डोस घेऊनही किती फायदा होईल, याची खात्री त्यांना नाही. इतर देशांत तिसरा डोस देण्यास सुरुवातही झाली आहे. शिवाय आयसीएमआरकडून तिसऱ्या डोसचा कितपत फायदा होईल, यावर साशंकित मत देण्यात आले आहे; मात्र एक वर्षानंतर अभ्यास करून बूस्टर डोस देण्यात यावा, असे मत डॉ. सुपे यांनी व्यक्त केले. आयसीएमआरने कदाचित वैज्ञानिक अधिष्ठानावर मत मांडले असावे. त्यांच्या मताशी सहमत असल्याचे कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले.

loading image
go to top