एका आठवड्यात पूर्ण होणार मुंबईचं लसीकरण; ९९.६ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण | Mumbai vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

एका आठवड्यात पूर्ण होणार मुंबईचं लसीकरण; ९९.६ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

मुंबई : कोरोनाविरुद्ध (corona pandemic) लढण्यासाठी १५ महिन्यांपूर्वी लसीकरणाची मोहीम (vaccination drive) सुरू झाली. मुंबईसह (Mumbai) राज्यातील लसीकरणाचे उद्दिष्टही आता पूर्ण होत आहे. सध्या ९९.६ टक्के मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण झाले असून केवळ ३४ हजार लाभार्थ्यांचा (vaccination second dose) दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळे किमान आठवडाभरात मुंबईतील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: माणूसकीची भिंत कोलमडली; 'KDMC'च्या उपक्रमाकडे खुद्द पालिकेचेच दुर्लक्ष

मुंबईत पात्र प्रौढ लाभार्थ्यांची संख्या ९२.३६ लाख आहे. त्यापैकी शनिवारपर्यंत ९९.६ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले. पुढील चार ते पाच दिवसांत मुंबईचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्याची खात्री पालिका अधिकाऱ्यांना आहे. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत १०० टक्के पहिला डोस पूर्ण झाला होता. लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने आणि बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने कोरोनाची लाट थोपवण्यात यश आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई देशात आघाडीवर

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात मुंबईने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. आताही मुंबईने लसीकरणात दिल्ली, चेन्नई, बंगळूरू या शहरांना मागे टाकले आहे. दिल्लीत आतापर्यंत ९१ टक्के, चेन्नई ८१ टक्के, बंगळूरूत ९३ टक्के लसीकरण झाले आहे.

हेही वाचा: दुचाकीचालकांचं भांडण, माजी कबड्डीपटूला भोकसले

अनेक नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याने तिसऱ्या लाटेचा फारसा प्रभा जाणवला नाही. अजूनही ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी तातडीने लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित व्हायला हवे आहे.
- डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोविड टास्क फोर्स.

दुसरा डोस पूर्ण करण्यात मुंबई राज्यात आघाडीवर आहे. अद्याप राज्यातील जवळपास एक कोटींहून अधिक नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक आहेत. लाट ओसरल्याने अनेक जिल्ह्यांतील नागरिकांनी दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवली आहे.
- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी.

लसीकरणाचा आलेख

मुंबई

पात्र लाभार्थी - ९२.४ लाख
पहिला डोस - १.०२ कोटी (१११ टक्के)
दुसरा डोस - १.०२ कोटी (९९.६ टक्के)

महाराष्ट्र
पात्र लाभार्थी - ९.१ कोटी
पहिला डोस - ८.४ कोटी (९१.९ टक्के)
दुसरा डोस - ६.७ कोटी (७४ टक्के)

दुसऱ्या डोसचे अत्यल्य प्रमाण
पुणे - ९०.७ टक्के
भंडारा - ८९ टक्के
सिंधुदुर्ग - ८६ टक्के
नागपूर - ७५ टक्के

Web Title: Corona Vaccination Will Be Completed In Mumbai In A Week As Ninety Nine Percent Vaccination Done Mumbai Vaccination Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top