esakal | 45 वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण; घेता येणार कोविडचा दुसरा डोस

बोलून बातमी शोधा

Vaccination
45 वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण; घेता येणार कोविडचा दुसरा डोस
sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : ४५ वर्षांवरील नागरिकांना(45 age group) मंगळवारी (४ मे) कोविड लशीचा दुसरा डोस (vaccine) देण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणी करुन अथवा थेट केंद्रावर जाऊन हे लसीकरण करता येणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. तसंच काही सरकारी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रावर ही लस उपलब्ध आहे. (corona vaccine dose to reach maharashtra for 45 age group)

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करुनच लस घ्यावी लागणार आहे. ही लस फक्त पाच केंद्रांवर मिळणार आहे. सोमवारी रात्री लशींचा साठा मिळण्याची शक्यता असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्येक केंद्रावर 500 व्यक्तींचं लसीकरण (डोस (vaccination) करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

'या' पाच केंद्रांवर मिळणार लस 

१. बा. य. ल.‌ नायर  रुग्णालय मुंबई सेंट्रल परिसर

२. राजावाडी रुग्णालय घाटकोपर 

३.डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालय विलेपार्ले 

४.सेव्हन हिल्स रुग्णालय मरोळ 

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

संपादन : शर्वरी जोशी