esakal | BMC : अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरी लसीकरण, 'या' ईमेलवर माहिती द्या
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरी लसीकरण, 'या' ईमेलवर माहिती द्या

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम (Corona Vaccination Drive) लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी महानगर पालिकेने (BMC) माहिती मागवली आहे. या नागरीकांची त्यांच्या घरी जाऊन लसीकरण (Home Vaccination) होण्याची शक्यता आहे. मुंबईत (Mumbai) आतापर्यंत 14 लाखाच्या आसपास नागरीकांना कोविड प्रतिबंधीत लसीचे (Corona Vaccine) दोन डोस मिळाले आहेत. तर,50 लाखाच्या आसपास नागरीकांना पहिला डोस मिळाला आहे.मात्र,सुरवाती पासून घरात अंथरुणाला खिळून असलेल्या नागरीकांच्या लसीकरणाचा पेच होता. त्याबाबत उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) धोरण ठरविण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने आता तयारी सुरु केली आहे. ( Corona Vaccines at home for old age disabled people drive from BMC-nss91)

हेही वाचा: नियम पायदळी ! मुंबईत दिवसाला 5 हजाराहून अधिक लोक बाधितांच्या संपर्कात

अंथरुणाला खिळून असलेल्या नागरीकांची माहिती महानगरपालिकेने covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल वर मागवली आहे. आजारपणासह शारीरिक, वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, असेही नागरिक आहेत. अश्या व्यक्तींना कोविड लस देता यावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे.यासाठी अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक ईमेलवर पाठवावे.असे आवाहन महापालिकेने केले आहे.

loading image