esakal | नियम पायदळी ! मुंबईत दिवसाला 5 हजाराहून अधिक लोक बाधितांच्या संपर्कात
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नियम पायदळी ! मुंबईत दिवसाला 5 हजाराहून अधिक लोक बाधितांच्या संपर्कात

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्ग (Corona Infection) नियंत्रणात येत असल्याचे दिसते. असे असले तरी 24 तासात 5 हजाराहून अधिक लोकं बाधितांच्या (Infected People) संपर्कात येत आहेत. त्यातील साधारणता 75 % लोकं हाय रिस्क मध्ये असल्याने ही संख्या कमी करणे मोठे आव्हानात्मक बनले आहे. मुंबईत (Mumbai) शुक्रवारी 446 नवे रुग्ण सापडले. रुग्णासंख्या 500 च्या आत आल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात (Corona Control) येत असल्याचे दिसते. असे असले तरी शुक्रवारी बधितांच्या संपर्कात आलेल्या 5,627 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आले. त्यातील 4,113 (73 %) लोकं 'हाय रिस्क' (High risk) होते तर 1,514 (27%) लोकं 'लो रिस्क' मध्ये होते. ( More than five thousand people connect with Corona infected people in mumbai-nss91)

हेही वाचा: कोब्रा सापाबरोबर खेळ, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणं सर्पमित्राला पडलं महाग

आतापर्यंत बधितांच्या संपर्कात आलेल्या 79,09,928 कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आले. त्यातील 44,02,839 (56%) 'हाय रिस्क' मध्ये तर 35,07,089(44%) 'लो रिस्क' मध्ये होते. 7,29,795 लोकं पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत सध्या फक्त 829 लोकं संस्थात्मक विलगिकरणात आहेत. तर आतापर्यंत 1,55,582 लोकांनी संस्थात्मक विलगिकरण झाले आहे. 86,968 लोक गृह विलगिकरणात असून आतापर्यंत 78,22,131 लोकांनी गृह विलगिकरण पूर्ण केले आहे.

loading image