'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षांसंदर्भात महत्त्वाची बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 13 March 2020

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता विद्यार्थ्यांनी केलीये. मुंबई पुण्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई पुण्यातील पन्नास टक्के अभ्यासिका रिकाम्या झाल्यात. MPSC परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी मुंबई पुण्यात येत असतात अशात कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता विद्यार्थ्यांनी केलीये. मुंबई पुण्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई पुण्यातील पन्नास टक्के अभ्यासिका रिकाम्या झाल्यात. MPSC परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी मुंबई पुण्यात येत असतात अशात कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय.

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतेय. दरम्यान उद्या ( दिनांक १४ मार्च रोजी )  या परीक्षा घेण्यात येणार असल्याने, आपली परीक्षा होणार की नाही, असं संभ्रमाचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आहे. शिक्षण विभागाकडून उद्याच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. 

मोठी बातमी - कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती...
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता आज मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.  येत्या काळात परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील इतर शहरातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.  

याचसोबत मुंबई , नवी मुंबई, ठाणे, पुणे , पिंपरी चिंचवड आणि नागपूर शहरातील जिम, व्यायामशाळा , जलतरण तलाव , नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पुढील काही दिवस नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येतेय. याचसोबत मुख्यमंत्र्यांनी सर्व खासगी कंपन्यांच्या मालकांना देखील शक्य असेल तिथे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी असं आवाहन केलंय. 

corona virus and mpsc exams confusion read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus and mpsc exams confusion read full news