esakal | कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसनं प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगभरात तब्बल ५००० लोकांचे प्राण गेले आहेत. डॉक्टरांना अद्याप कोरोनावर औषध मिळालं नाहीये. मात्र कोरोना आणि कोरोनाबाधित रुग्णांवर संशोधकांकडून संशोधन  करण्यात येतंय. मानवी शरीरावर कोरोनाचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दलचा खुलासा संशोधकांनी केला आहे. 

संशोधकानी कोरोनाबाधित मृतांच्या शरीराची चाचणी केली. कोरोना झाल्यानंतर मानवी शरीराला मोठी इजा होते असं स्पष्ट करण्यात आलं. तसंच कोरोनामुळे फुप्फुसाला छिद्र पडतात असं संशोधकांनी स्पष्ट केलंय. ‘जर्नल ऑफ थोरॅसिक ऑन्कोलॉजी’ या नियतकालिकात असं स्पष्ट करण्यात आलं आहे. दोन रुग्णांच्या फुप्फुसाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यात सीओव्हीआयडी १९ म्हणजे सार्स सीओव्ही व्ही २ हा विषाणू आढळला.  त्यांच्या फुप्फुसात या विषाणूमुळे अनेक प्रकारची हानी झाली होती. 

हेही वाचा: मुख्याध्यापकच विद्यार्थिनीशी असा वागला.... 

यामध्ये द्रव प्रथिनरूपी स्त्राव आढळला, तसंच फुप्फुसाच्या उती फाटलेल्या होत्या, फुफ्फुसांना सूज देखील आल्याचं निरीक्षण करण्यात आलंय. कोरोनामुळे केंद्रकं असलेल्या मोठ्या पेशी तयार झाल्या होत्या. या दोन रुग्णांमध्ये ८४ वर्षांच्या महिलेचा समावेश होता. तिच्या फुप्फुसात १.५ से.मी.ची गाठ तयार झाली होती. सीटीस्कॅनमध्ये तिच्या मृत्यूनंतर ही गाठ दिसली. ऑक्सिजन देण्याचे उपचारही तिच्यावर अपयशी ठरले होते. दुसरा रुग्ण ७३ वर्षांचा पुरुष होता. त्याला कर्करोगाच्या उपचारासाठी दाखल केलं होतं. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाली होती. या दोघांच्याही फुप्फुसाला गंभीर इजा झाली होती आणि छिद्र तयार झाले होते. 

हेही वाचा: 'वर्षा'च्या भिंतीवर 'त्या' मजकूराबद्दल अमृता फडणवीस म्हणाल्या....  

दरम्यान आता यावर रोगनिदान शास्त्राच्या माध्यमातून प्रथमच कोरोना विषाणूचा अभ्यास करण्यात आला आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर प्राथमिक काळात कायबदल फुप्फुसात दिसतात याचा शोध घेण्यात आला आहे, असं युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मेडिसीन या संस्थेच्या वैज्ञानिकांनी म्हंटलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या संपूर्ण आरोग्याला जपण्याची गरज आहे. 

Scientist says corona may creates holes in your lungs      

loading image