esakal | अरे देवा! मुंबईतला 'हा' भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, पालिकेची डोकेदुखी वाढणार?
sakal

बोलून बातमी शोधा

अरे देवा! मुंबईतला 'हा' भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, पालिकेची डोकेदुखी वाढणार?

मुंबईतील घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या ठिकाणी कोरोनामुळे ५७५ जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

अरे देवा! मुंबईतला 'हा' भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, पालिकेची डोकेदुखी वाढणार?

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. अशातच मुंबईतील घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या ठिकाणी कोरोनामुळे ५७५ जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ६६४५ जणांचा शहरात शनिवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. यात एन वॉर्डचा प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर  के वॉर्ड(पूर्व विलेपार्ले-अंधेरी-जोगेश्वरी) येथे एकूण ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जी नॉर्थ वॉर्ड(धारावी-दादर-माहिम) येथे यापूर्वी कोरोनाची भयंकर परिस्थिती होती. मात्र आता हे परिसर तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ४२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 

घाटकोपर येथे मृत्यूदर सर्वाधिक म्हणजेच ९ टक्के असून तो एकूणच शहराच्या दुप्पट आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये घाटकोपर हा सहाव्या क्रमांकावर असून येथे मार्च पासून ६२६३ रुग्ण आढळून आलेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घाटकोपर या परिसरातील मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. त्याचसोबत यापूर्वी झालेल्या मृतांचा आकडा सुद्धा नव्या मृतांच्या आकडेवारीत म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीत दाखवला जाणार आहे. त्यामुळे एकूण महिन्याभारत किती जणांचा बळी गेला हे समजून येणार आहे.

हेही वाचाः चाकरमान्यांना दिलेला शब्द मनसेनं पाळला, मुंबई ते कोकण थेट स्पेशल बस

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा नियंत्रण आणण्यात पालिकेला यश आलं असलं तरी कोरोनाचे नवनवे बनत असलेले हॉटस्पॉट पालिकेची डोकेदुखी वाढवणार आहे हे नक्की. मुंबईत वरळी, धारावी, मालाड नंतर आता घाटकोपर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट तयार झाला आहे. 

येथे बहुतांश कोरोनाचे रुग्ण हे इमारतीत राहणारे आहेत. मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल म्हणून महापालिकेकडून अधिक नागरिकांची चाचणीच करण्यात येत नसल्याचं घाटकोपरचे आमदार पराग शाह यांनी असे म्हटलंय. यावर महापालिकेनं म्हटलं की,  स्थानिक राजकीय नेत्यांनी इमारतीमधील नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी विनंती केली. मात्र याबाबद्दल आम्ही आधीच विचार केला होता. यामध्ये बहुतांश नागरिकांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यामधील काहींना अन्य आजार असल्याचं ही आढळून आलं आहे. 

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांनी तेजस ठाकरेंना दिलेल्या परवानगीवर आशिष शेलार म्हणतात...

corona virus cases update mumbai ghatkoper new covid 19 hotspot

loading image