esakal | BMC : कोविड लक्षणे असल्यास तातडीने चाचण्या करा | BMC
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Symptoms

BMC : कोविड लक्षणे असल्यास तातडीने चाचण्या करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, कोविडबाधितांच्या संपर्कात (corona virus) आलेल्या तसेच कोविडची लक्षणे (corona symptoms) आढळून आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी (corona test) करून घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने (bmc) केले आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या; सरकारकडे मागणी

महापालिकेच्या २६० केंद्रांवर मोफत कोविड चाचणी करण्यात येत आहेत. या केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या जवळील केंद्रांची माहिती नागरिकांना मिळू शकेल. कोविड चाचणी वेळेत झाल्यास बाधित व्यक्तीला वेळेवर उपचार मिळण्यासह त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्यास प्रतिबंध होऊ शकेल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

याशिवाय ज्येष्ठ नागरिक, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब अशा सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी आणि प्रसूतीकाळ नजीक असलेल्या गर्भवती, डायलिसिस रुग्ण, कर्करुग्ण यांनी अधिकाधिक काळजी घ्यावी, असेदेखील आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top