esakal | मुंबईतल्या चाळींमध्ये कशी आहे कोरोनाची परिस्थिती, जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

Mumbai sealed building
मुंबईतल्या चाळींमध्ये कशी आहे कोरोनाची परिस्थिती, जाणून घ्या
sakal_logo
By
समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शहरात चाळींची संख्या जास्त असलेल्या प्रभागात सध्या मृत्यूदर अधिक आहे. सॅन्डहर्स्ट रोड, महम्मद अली रोड, मश्जिद बंदर या सी प्रभागात कोविडच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यूदर आहे. या प्रभागात एप्रिल महिन्यात 1.62 टक्के मृत्यूदर आहे. मुंबईचा सरासरी मृत्यूदर 0.5 टक्के आहे. या पाठोपाठ शेजारील बी प्रभागाचा मृत्यू 1.04 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर वरळी प्रभादेवी जी दक्षिण प्रभागात 0.94 टक्के मृत्यूदर आहे.

सी आणि बी प्रभागात मुंबईतील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. बी प्रभागात आतापर्यंत 2 हजार 673 रुग्णांची नोंद झाली आहे. सी प्रभागात त्या खालोखाल 4 हजार 959 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र या प्रभागांमधील मृत्यूदर सर्वाधिक आहे. एप्रिल महिन्यात बी प्रभागात 766 रुग्ण नोंदविण्यात आले त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला. सी प्रभागात 1 हजार 412 रुग्णांची नोंद झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

जी दक्षिण वरळी प्रभादेवी परिसरात 5 हजार 404 रुग्णांची नोंद एप्रिल महिन्यात झाली आहेत. 51 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रभागात मृत्यूदर 0.94 टक्के आहे. त्या खालोखाल लालबाग परळ एफ दक्षिण प्रभागात मृत्यूदर 0.81 टक्के आहे. या प्रभागात 34 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून 4 हजार 195 रुग्णांची नोंद एप्रिल महिन्यात झाली आहे. या चारही प्रभागात चाळींची संख्या जास्त आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी? पालिका 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

सर्वाधिक ते सर्वात कमी

कुर्ला एल आणि एम पश्‍चिम चेंबूर या दोन प्रभागात कोविडच्या पहिल्या लाटेत मृत्यूदर अधिक होता. मात्र आता एल प्रभागात सर्वात कमी 0.27 टक्के मृत्यूदर आहे. हा मुंबईतील सर्वात कमी दर आहे. एम पश्‍चिम प्रभागात मृत्यूदर मुंबईच्या सरासरी एवढचा 0.56 टक्के एवढा आहे.

हेही वाचा: चिंताजनक बातमी: लॉकडाऊन काळातही वाढतेय रुग्णांची संख्या

आठ प्रभागात सरासरीपेक्षा अधिक दर

मुंबईतील आठ प्रभागांमध्ये सरासरी पेक्षा अधिक मृत्यूदर आहे. एन घाटकोपर 0.86, एच पूर्व वांद्रे, सांताक्रुझ पूर्व 0.66, एम पूर्व मानखुर्द गोवंडी देवनार 0.65, आर दक्षिण कांदिवली 0.62 हे मुंबईच्या सरासरी पेक्षा जास्त मृत्यूदर असलेले प्रभाग आहेत.

एप्रिल महिन्यात

नोंदवलेले रुग्ण- 1 लाख 85 हजार 863

मृत्यू- 944

उपचार सुरु असलेले - 81 हजार 538 

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona virus death toll currently higher in chawl mumbai