esakal | मुंबईत ६.३ लाख लोकं होम क्वारंटाइन; मृत्यूच्या दरात घट

बोलून बातमी शोधा

home quarantine
मुंबईत ६.३ लाख लोकं होम क्वारंटाइन; मृत्यूच्या दरात घट
sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात अनेकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे अनेकांना घरीच होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यामध्ये मुंबईत सध्या ३. ३४ लाख नागरिक होम क्वारंटाइन झाले आहेत. विशेष म्हणजे यातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं असून आता मृत्यूदर केवळ १ टक्केवर आला आहे. अशी माहिती महानगर पालिकेने दिली आहे. पालिकेने दिलेल्या अहवालात सध्या ८७ हजार,६९८ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच होम क्वारंटाइन होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. आतापर्यंत मुंबईत ६ लाख ३४ हजार लोक होम क्वारंटाइन आहेत. त्यात उच्चभ्रू सोसायटींमध्ये राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. होम क्वारंटाइन असलेल्या अनेकांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर, काही जण लक्षणविरहित असूनही त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे स्वतंत्र खोली आणि शौचालय आहे, तेच नागरिक होम क्वारंटाइनचा पर्याय निवडत आहेत, असं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं.

महानगर पालिकेच्या माहितीनुसार, १० फेब्रुवारीपासून आतापर्यंत २.६६ लाख लोकं पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ०.० ३ टक्के आहे. गेल्या ७० दिवसात कोविडमध्ये ९५३ लोकांचा मृत्यू झाला. १० फेब्रुवारी ते २० एप्रिल दरम्यान मृत्यूचे प्रमाण ०.० ३ टक्के (सरासरी दररोज १३ मृत्यू) होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम, मास्क शिवाय फिरणाऱ्या लोकांना केलेला दंड आणि आरोग्य यंत्रणेची मदत झाल्याची माहिती मनपा आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिली.

हेही वाचा: डोळ्यांना लेन्स लावून अंघोळ करताय? मग आधी हे वाचा

त्या तुलनेत राज्यात याच काळात मृत्यूचे प्रमाण ०.५१ टक्के राहिले आहे. तर आतापर्यंतच्या कालावधीत मृत्यूचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी राहिले असले तरी मृत्यूची संख्या वाढली आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून व्हायरसमुळे होणारा मृत्यू दर १ टक्क्यांवर आला आहे.१४ एप्रिलपासून मृत्यूची संख्या दररोज ४३ ते ५८ दरम्यान आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी मुंबईतील मृत्यूचे प्रमाण ६०% होते. राज्यात त्यावेळी मृत्यूचे प्रमाण ६ टक्के होते. या मृत्यूंचा अभ्यास करण्यासाठी राज्यात ५ सदस्यीय समितीदेखील नेमण्यात आली होती. तर मुख्य शहरांसाठी ९ सदस्यीय विशेष समिती स्थापित करण्यात आली. शहरात आतापर्यंत १२,३४७ मृत्यूची नोंद झाली आहे.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, सध्या शहरात ६९,२१९ सक्रिय रुग्ण आहेत.त्यात ७९ टक्के लोकं असीम्टेमॅटिक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. असीम्टेमॅटिक रुग्णांना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंट टाईन असतात.१० फेब्रुवारीपर्यंतच्या सीमटेमॅटिक आणि असीम्टेमॅटिक प्रकरणांचे प्रमाण ८०:२० च्या श्रेणीत आहे. त्यातील दोन टक्के सक्रिय रुग्ण गंभीर आहेत, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आकडेवारीत नमूद केले आहे.

संपादन : शर्वरी जोशी