कल्याण ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रसाराला आळा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

एकीकडे कल्याण आणि डोंबिवली शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कल्याण ग्रामीण परिसरातील बहुतांश भागात कोरोनाच्या प्रसाराला चांगल्या प्रकारे आळा बसला असल्याचे दिसून येते.

कल्याण: एकीकडे कल्याण आणि डोंबिवली शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कल्याण ग्रामीण परिसरातील बहुतांश भागात कोरोनाच्या प्रसाराला चांगल्या प्रकारे आळा बसला असल्याचे दिसून येते. नागरिकांमधील सतर्कता, संवाद, फवारणीच्या कामात असलेले सातत्य यामुळे कोरोनाची ग्रामस्थ चांगल्या प्रकारे दोन हात करत असल्याचे दिसून येते. या भागात मनसेचे पदाधिकारी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून  नागरिकांना मदत करत असल्याने ग्रामस्थांनी  समाधान व्यक्त केले आहे.

कल्याण ग्रामीण भागात मोठ्या संख्येने झारखंड, उत्तर प्रदेश येथील हजारो कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील हे मार्गदर्शन करत आहे. विविध गावांमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरविणे, फवारणी करणे व इतर कामांकडे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे जातीने लक्ष देत आहेत.  मनसेच्या घरपोच भाजी उपक्रमालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सोमवारी डोंबिवली नजीक पलावा सिटी व आसपासच्या सर्व परिसरात योगेश पाटील,  शैलेश कुर्ले, योगेश दराडे, चंदरेश शर्मा, भगवान पानसरे, अमोल पुकले आदींच्या उपस्थितीत फवारणीचे काम करण्यात आले. लॉकडाऊन संपल्यावरही सर्व कामे मनसेच्या वतीने नियमित करण्यात येणार आहे, असे योगेश पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus mns working in kalyan rural area