मुंबई विना मास्क फिरणाऱ्यांची काही खैर नाही, दुप्पट मार्शल तैनात

मुंबई विना मास्क फिरणाऱ्यांची काही खैर नाही, दुप्पट मार्शल तैनात

मुंबई: सार्वजनिक ठिकाणं, प्रार्थनास्थळे, कार्यालये, सभागृह अशा ठिकाणी आता मास्क न वापरणाऱ्यांवर महानगर पालिकेच्या कारवाईचा पट्टा चालणार आहे. रोज किमान 25 हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले असून पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. सध्या संपूर्ण शहरात तैनात असलेल्या 2 हजार 400 मार्शलची संख्या वाढवून 4 हजार 800 करण्यात येणार आहे.

कोविडच्या वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धाडी टाकून मास्क न वापरणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. लोकल प्रवासात प्रवासी मास्क वापरत नसल्याचे आढळल्याने प्रत्येक रेल्वे मार्गावर 100 या प्रकारे 300 क्लिनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांच्या परिसरातही पुरुषांसह महिला मार्शलची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच 50 पेक्षा अधिक व्यक्ती त्याच वेळी दिसल्यास कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. सध्या संपूर्ण मुंबईत 2 हजार 400 मार्शल तैनात आहेत. त्यांची संख्या दुप्पट करुन ती 4 हजार 800 करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सध्या सरासरी 12 हजार ते 12 हजार 500 विना मास्क नागरिकांवर कारवाई होते. ही संख्या 25 हजार पर्यंत वाढवावी असे टाग्रेटचे आयुक्तांनी दिले आहे.

हेही वाचा- Mumbai Hotspots: मुंबईतील 'हे' चार विभाग पुन्हा हॉटस्पॉटच्या दिशेने
 
खेळाची मैदाने, उद्याने या ठिकाणीही तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. मास्क न वापरणे, 50 पेक्षा जास्त नागरिक एकत्र असणे अशा वेळी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus More than 4 thousand  marshals currently deployed mumbai city

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com