काळजी घ्या! मुंबईतील 'या' 11 वॉर्डमध्ये कोरोनाचा पुन्हा वाढता विळखा

काळजी घ्या! मुंबईतील 'या' 11 वॉर्डमध्ये कोरोनाचा पुन्हा वाढता विळखा

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा कोरोना हात पाय पसरु लागला आहे. गेल्या 9 दिवसांपासून मुंबईत कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, कोरोना महामारीच्या सुरूवातीला ज्या प्रभागांमध्ये अधिक रुग्ण आढळले. त्याच 11 प्रभागांमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा तळ ठोकला आहे. 

गेल्या सात दिवसांत मुलुंड, अंधेरी पश्चिम, घाटकोपर, अंधेरी पूर्व, वांद्रे, भांडुप, ग्रँट रोड आणि बोरिवली येथे सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. 9 फेब्रुवारीला मुंबईत 375 नवीन रूग्ण आढळले, तेव्हापासूनच रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. रविवारी 921 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 7 दिवसातील आकडेवारी पाहिल्यास 11 प्रभागात कोरोनाचे 2 हजार 778 नवीन रुग्ण आढळले आहेत.

पालिका आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, झोपडपट्टी नसलेल्या भागात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झाला आहे. सुरुवातीला बरेच लोक परदेशातून परत येत होते. परंतु आता इमारतींमधील प्रकरणे वाढण्याचे कारण समजून घ्यावे लागेल. एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकांकडून दुर्लक्ष होत आहे.

लसीच्या तिसर्‍या टप्प्याबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना नाही

कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून मार्चपासून डॉक्टर्स आणि पालिकेचे अधिकारी वॉर्ड अधिकाऱ्यांना वृद्ध आणि इतर आजारांनी त्रस्त असलेल्या मुंबईकरांचे लसीकरण करण्याचे सुचवत आहेत. मात्र, पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांना तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबत कोणतीही मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. नोंदणीची प्रक्रिया कशी केली जाईल याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी साांगितले की, नोंदणीची प्रक्रिया इतकी सोपी नसेल. 

मुंबईत आतापर्यंत 3.19 लाख प्रकरणे

मुंबईतील कोरोनामुळे त्रस्त लोकांची संख्या वाढून 3 लाख 19 हजार 128 झाली आहे. त्यातील 3 लाख 959 रुग्ण बरे झाले आहेत. 11 हजार 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात 5 हजार 859 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. 

येथे गेल्या सात दिवसातील सर्वोच्च प्रकरण 

मुंबईमध्ये गेल्या 7 दिवसांत या 11 प्रभागांत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये  374, आर वेस्ट (अंधेरी) मध्ये 329, एन (घाटकोपर) मध्ये 292, के पूर्व (अंधेरी पूर्व) मध्ये 276 एच पश्चिम (वांद्रे) मध्ये 265, एस (भांडुप) मध्ये 225  डी वॉर्ड ( ग्रँट रोड 217, आर सेंट्रल (बोरिवली) मध्ये 215, आर दक्षिण (कांदिवली) 201, पी उत्तर (मालाड) 194 आणि एन वेस्ट (चेंबूर) 190 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. 

राज्यात 21 लाख कोरोना बाधित 

रविवारी राज्यात 6, 971 नवीन कोरोना रूग्ण सापल्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या  21 लाख 884 झाली आहे. राज्यात एकूण मृतांची संख्या 51,788 वर गेली आहे तर, रविवारी 35 मृत्यू झाले आहेत. राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या 52,956 एवढी आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus mumbai 921 new patients found 11 wards

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com