मुंबईत रुग्णांचा भडका, शहरात नव्या २ हजार रुग्णांची भर

मिलिंद तांबे
Thursday, 10 September 2020

राज्याप्रमाणेच मुंबईत ही बुधवारी कोरोनाबाधित रुग्णांचा भडका उडाला असून 2,227 नवे रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,60,744 झाली आहे. मुंबईत बुधवारी 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृतांचा आकडा 7,982 वर पोहोचला आहे.

मुंबई: राज्याप्रमाणेच मुंबईत ही बुधवारी कोरोनाबाधित रुग्णांचा भडका उडाला असून 2,227 नवे रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,60,744 झाली आहे. मुंबईत बुधवारी 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृतांचा आकडा 7,982 वर पोहोचला आहे. मुंबईत बुधवारी 839 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर 79 टक्के इतका झाला आहे.                     

मुंबईत आज नोंद झालेल्या 43 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 28 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 43 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षाखालील होते. तर 30 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते तर उर्वरीत 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. 

बुधवारी 839 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,26,745 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 63 दिवसांवर गेला आहे. तर 8 सप्टेंबरपर्यंत एकूण 8,56,454 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.10 इतका आहे. 

मुंबईत 555 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,207 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 6,316 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,271 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

राज्यात सर्वाधित बाधित रूग्णांची नोंद

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा बुधवारीही विस्फोट झाला. दिवसभरात 23,816 रुग्णांची उच्चांकी भर पडल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 9,67,349  झाली आहे.  राज्यात बुधवारी दिवसभरात 13,906 रुग्ण कोरोनामुक्त झाले. बुधवारी ठाणे तसेच पुणे मंडळात सर्वाधिक रूग्णवाढ झाली आहे. 

राज्यात दिवसभरात  380 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 27,787 वर पोहोचला आहे. बुधवारी नोंद झालेल्या 380 मृत्यूंपैकी 237 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 55 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 88 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 2,52,734 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी 13,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 6,86,462 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.96% एवढे झाले आहे. 

-----------------

(संपादनः पूजा विचारे) 

Corona Virus mumbai patients count 2 thousand new cases


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus mumbai patients count 2 thousand new cases