esakal | एकाच वेळी तब्बल दीड लाख लोकं घेऊ शकतील एवढा साडेतीन टनांचा हुक्का जप्त, मुंबई पोलिसांची मेगा कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच वेळी तब्बल दीड लाख लोकं घेऊ शकतील एवढा साडेतीन टनांचा हुक्का जप्त, मुंबई पोलिसांची मेगा कारवाई

समोर येणाऱ्या माहितीनुसार हे हुक्का फ्लेवर्स हे जयकिशन अग्रवाल यांनी बेकायदेशीररित्या साठवून ठेवले होते.

एकाच वेळी तब्बल दीड लाख लोकं घेऊ शकतील एवढा साडेतीन टनांचा हुक्का जप्त, मुंबई पोलिसांची मेगा कारवाई

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : ख्रिसमसला सुरवात झाली आहे. अशात सर्वांचा पार्टी मूड पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन देखील केलं जातं. दरम्यान ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स पोलिसांनी जप्त केले आहेत.  हा ८ कोटी रुपयांचा प्रतिबंधित हुक्का मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे. जवळपास ८० पेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्काचे फ्लेवर्स यामध्ये असून गोरेगाव पुर्व भागातून हे हुक्क्याचे फ्लेवर्स जप्त मुंबई पोलिसांनी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या हुक्क्याच्या फ्लेवर्सचे वजन तब्बल साडेतीन टन आहे. एवढा हुक्का एकावेळेस १ लाख ५० हजार जण घेऊ शकतात. 

महत्त्वाची बातमी : बनावट स्कॉच विक्रेत्यांवर अबकारी विभागाची कारवाई, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

समोर येणाऱ्या माहितीनुसार हे हुक्का फ्लेवर्स हे जयकिशन अग्रवाल यांनी बेकायदेशीररित्या साठवून ठेवले होते. २३ डिसेंबर २०२० रोजी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक आणि समाजसेवा शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान मुकादम कंपाउंड, जनरल ए. के. वैदय मार्ग, गोरेगाव या ठिकाणी छापा टाकला गेला होता.  

मुंबईच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi news from mumbai

या छाप्याप्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने प्रतिबंध अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक पुढील तपस आणि कारवाई करत आहे. सदर मोठी कारवाई पोलिस सहआयुक्‍त मिलींद भारंबे आणि अप्पर पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलिस आयुक्त संजय पाटील, पोलिस निरीक्षक पोखरकर आणि पोलिस उप निरीक्षक बिपीन चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

mumbai police captured flavors of hukka worth rupees eight crore

loading image