कोरोनाच्या मुंबईतील परिस्थितीबाबत गुड न्यूज; आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

aditya thackeray
aditya thackeray

मुंबई - भारतात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून याची  माहिती दिली असून मुंबईत आज फक्त 700 कोरोना रुग्ण आढळले असल्याचे ट्विट त्यांनी केले. तसंच आतापर्यंत सर्वाधिक 8776 जणांच्या कोरोना टेस्ट केल्यानंतरही इतके कमी रुग्ण सापडले आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

ट्विटरवर आदित्य ठाकरे म्हणाले की, बीएमसीकडून सुरु कऱण्यात आलेल्या चेस द व्हायरस मोहिमेअंतर्गत मुंबईत कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रातही लागू करण्यात येणार आहे. मुंबईतील ही गूड न्यूज शेअर करताना आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. यामुळे बिनधास्त न होऊन मास्क न घालता फिरू नका. कोरोनाला हरवायचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

मुंबईत सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार 25 जुलैला सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या होत्या. तेव्हा शहरात 8 हजार 494 जणांची चाचणी झाली होती. त्याआधी एक दिवस हीच संख्या 7 हजार 609 इतकी होती. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या दुप्पट होण्याचा वेगही कमी झाला आहे. कोरोना रुग्णांच्या दुप्पट होण्याचा दर आता 68 दिवसांवर पोहोचला आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सुरुवातील राज्यात वेगाने कोरोनाचा संसर्ग पसरला मात्र आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं काही ठिकाणी दिसत आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारपर्यंत राज्यातील रिकव्हरी दर 57.84 टक्के झाला आहे तर मृत्यू दर 3.62 टक्के आहे. सध्या राज्यात 9 लाख 22 हजार 637 जण होम क्वारंटाइन आहेत. तर 44 हजार 136 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत. तसंच राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 896 कोरोनाबाधित असून 2 लाख 21 हजार 944 जण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 13 हजार 883 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By - Suraj Yadav

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com