वस्त्या चाळीच्या प्रभागात मृत्यूदर अधिक, सॅन्डहर्स्ट रोडचा मृत्यूदर सर्वाधिक

समीर सुर्वे
Sunday, 11 October 2020

वस्त्या आणि चाळी असलेल्या प्रभागातील मृत्यूदर आजही सर्वाधिक आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेने मृत्यूदरात घट झालेली आहे. मात्र, सात प्रभागातील मृत्यूदर आजही 5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. यात, सॅन्डहर्स्ट रोड परिसरत बी प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक 6.26 टक्के मृत्यूदर आहे.

मुंबई: वस्त्या आणि चाळी असलेल्या प्रभागातील मृत्यूदर आजही सर्वाधिक आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेने मृत्यूदरात घट झालेली आहे. मात्र, सात प्रभागातील मृत्यूदर आजही 5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. यात, सॅन्डहर्स्ट रोड परिसरत बी प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक 6.26 टक्के मृत्यूदर आहे.

मुंबईतील मृत्यूदरात गेल्या महिन्याभरात घट झाली आहे. 9 सप्टेंबरला मृत्यू दर 4.81 टक्के होता. तर, 8 ऑक्‍टोबर रोजी मृत्यूदर 4.17 टक्‍क्‍या नोंदविण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षा मार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे.मात्र,आजही वस्त्या आणि चाळींमधील लोकसंख्या जास्त असलेल्या प्रभागात मृत्यूदराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

अधिक वाचाः  मुंबईकरांच्या गर्दीपुढे एसटीच्या फेऱ्या कमीच; ठाणे, कल्याण, पनवेल मार्गावरील बस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा
 

सॅन्डहर्स्ट रोड बी प्रभागात जुन्या चाळींची संख्या सर्वाधिक असून तेथे शहरातील सर्वाधिक 6.26 टक्के मृत्यूदर आहे. त्या खालोखाल एल प्रभाग कुर्ला परीसरात 6.05 टक्के मृत्यूदर आहे. कुर्ला परिसरातही वस्त्यांमध्ये राहाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्या खालोखाल वांद्रे, सांताक्रुझ पूर्व एच, पूर्व प्रभागात 5.50 टक्के, जी दक्षिण वरळी, प्रभादेवी परिसरात मृत्यूदर 5.39 टक्के आहे. या भागात वस्त्यांमधील राहणारी लोकसंख्या कमी असली तरी चाळीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

अधिक वाचाः  भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळेच घटना घडल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट

दादर, माहिम, धारावी जी उत्तर प्रभागाचा मृत्यूदर 4.97 टक्के आहे. गोवंडी, देवनार परिसरात एम पूर्व प्रभागात मृत्यूदर 5.05 टक्के आहे. भांडूप, विक्रोळी एस प्रभागातही मृत्यूदर 5.04 टक्के आहे. 

8 ऑक्टोबर पर्यंत 5 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यूदर असलेल्या प्रभागांमधील  रुग्ण आणि मृत्यू 

प्रभाग रुग्ण मृत्यू
     
बी 1757 110
जी दक्षिण 8508 459
जी उत्तर 11432 569
एच पूर्व 7122 392
एल 8280 501
एम पूर्व 7020 355
एम पश्चिम 6258 333
एस 10822 546

----------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

corona virus update Sandhurst Road has the highest mortality rate


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus update Sandhurst Road has the highest mortality rate