esakal | Bird Flu | कोरोनामुळे बर्ड फ्लू आजाराशी लढणे होणार सोपे, तज्ज्ञांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

Bird Flu | कोरोनामुळे बर्ड फ्लू आजाराशी लढणे होणार सोपे, तज्ज्ञांचे मत

कोरोना संसर्गाचे आव्हान कायम असतानाच बर्ड फ्लू आल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

Bird Flu | कोरोनामुळे बर्ड फ्लू आजाराशी लढणे होणार सोपे, तज्ज्ञांचे मत

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: जगभरात कोरोनाची साथ संपत नाही तोच भारतात बर्ड फ्लू झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर गेल्या दहा दिवसांमध्ये जवळ-जवळ चार लाखांपेक्षा जास्त पक्षांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये बर्ड फ्लूला अधिकृत दुजोरा दिला गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोंबड्या, बगळे, आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. 

भारतीय नागरिकांचे 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोनाशी दोन हात करण्यात गेलेले असले तरीही अजूनही कोरोनावर विजय मिळवलेला नाही. कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग अस्तित्वात आहे म्हणूनच 2021 हे वर्ष आपल्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे. कोरोना संसर्गाचे आव्हान कायम असतानाच बर्ड फ्लू आल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. उमेश कापूसकर यांनी सांगितले की, "कोरोना महामारीचा सामना करताना नागरिकांमध्ये या रोगाविषयी आढळलेली लक्षणे सर्वश्रूत आहेतच मात्र बर्ड फ्लूचा विचार केला तर या रोगाची लक्षणे लक्षणे सामान्य फ्लूसारखे असतात. यामध्ये श्वास घेण्यास त्रास, मळमळ होणे, ताफ, सर्दी, डोक्यात दुखणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे इत्यादी लक्षणे जाणवतात. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

साधारणतः बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 8 दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य फ्यूसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, घशात, उलटी, डोकेदुखी, सांधेदुखी, इनसोमनिया आणि डोळ्यांचे आजार यासारखी लक्षणे दिसून येतात. बर्ड फ्लूची लागण माणसांना होण्याची शक्यता कमी आहे. 2006 मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला होता. त्यानंतर अनेकदा भारतात बर्ड फ्लूची साथ आली. पण माणसांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही, त्यावेळी जगात फक्त 60 लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता यात 39 लोक एकट्या इजिप्त मधले होते."

संसर्गजन्य आजार  नियंत्रणात ठेवणे हे अजूनही नागरिकांच्या हातात आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतराचे निकष पाळले तर विषाणू संसर्ग नियंत्रणात येऊ शकतो. बर्ड फ्लूमध्ये जनुकीय बदल झाल्यास नवा विषाणू तयार होतो. यातून तयार झालेल्या विषाणूचे गुणधर्म सांगणं सध्या कठिण आहे विषाणूचे स्वरूप बदलण्याचा (म्युटेशन) प्रकार नवा नाही. त्यामुळे घाबरू नये. कोणताही संसर्गजन्य आजार पसरवणाऱ्या विषाणूचे स्वरूप बदलतच असते. या बदलत्या स्वरूपाच्या विषाणूमध्ये आजाराची तीव्रता अधिक दिसून आलेली नसेल तर संसर्ग अधिक फैलावणार नाही, याची काळजी नागरिकांनी  घ्यायला हवी. 

हेही वाचा- मुंबईत 10 लसीकरण केंद्रांवर 1 हजार 597 हेल्थकेअर वर्कर्संना टोचली लस

1997  मध्ये बर्ड फ्लूचं माणसांमधील संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. परंतु आज आपण 2021 मध्ये आहोत आणि वैद्यकीय तंत्रज्ञान सुद्धा आधुनिक झाले आहेत त्यामुळे संसर्गजन्य रोगाची चिंता न करता कुठलाही संसर्गजन्य आजार आपल्याला होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकांची कर्तव्य आहे, अशी माहिती डॉ. उमेश कापूसकर यांनी दिली.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)