मुंबईत कोरोना थांबता थांबेना; गेल्या 24 तासात 1346 नवे रुग्णांची भर

मिलिंद तांबे
Tuesday, 8 September 2020

मुंबईत आज 1346 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1,58,756 झाली आहे. 42 जणांचा आज मृत्यू झाला.

मुंबई : मुंबईत आज 1346 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1,58,756 झाली आहे. 42 जणांचा आज मृत्यू झाला. यासोबतच मुंबईतील मृतांचा आकडा 7,939 वर पोहोचला आहे. दरम्यान, आज 887 रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 79 टक्के इतका आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी तिघांना अटक; 11 सप्टेंबरपर्यंत एनआयए कोठडी

मुंबईत आज झालेल्या 42 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 28 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश होता. मृतांपैकी 27 रुग्णांचे वय 60 हून अधिक होते. तर, 15 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते. मुंबईत आतापर्यंत 1,25,906 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर गेला असून रुग्णवाढिचा दर 1.07 टक्के इतका आहे.  7 सप्टेंबरपर्यंत एकूण 8,43,691 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या.  

बेकायदा बांधकामप्रकरणी कंगनाला BMC नोटीस; चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा

561 कंटेन्मेंट झोन
मुंबईत 561 इमारती आणि वस्त्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,126 आहे. गेल्या 24 तासात 6,796 कोरोना संशयित आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona will not stop in Mumbai; Added 1346 new patients in last 24 hours

टॉपिकस