ठाणे जिल्ह्यातील 'हे' योद्धे कोरोनाच्या विळख्यात; विशेष कक्षही केला तयार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

मागील काही दिवसापूर्वी ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील परिचारिका कोरोनाबाधित आढळली होती. त्यापाठोपाठ आता  जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला ही कोरोनाची लागण झाली आहे.

ठाणे : मागील काही दिवसापूर्वी ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील परिचारिका कोरोनाबाधित आढळली होती. त्यापाठोपाठ आता  जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला ही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता,  उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील परिचारिकेला देखील कोरोनाची लागण झाल्याने शासकीय आरोग्य विभागालाच कोरोनाचा विळखा पडत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील 18 परिचारिका 1 ब्रदर्स,  2 वॉर्ड बॉय तर, उल्हासनगर मध्यार्ती रुग्णालयातील एक परिचारिका अशा एकूण 22 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. 

मोठी बातमी ः आम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

वाढत्या रुग्णसंख्येमुळे  एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच ठाणे जिल्हा रुग्णालय हे पूर्णतः कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिका यांना घरी न पाठवता, त्यांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच हॉटेलमधील एका परिचारिकेला ताप आल्याने तिचे स्वॅब नमुने पाठविले असता तिचा अहवाल पॉझीटिव्ह आला. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या 17 परिचारिकांचा अहवाल पॉझीटिव्ह आला. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने खबरदारी म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची टप्प्याटप्प्याने चाचणी करण्यात येत आहे. त्यात रुग्णालयातील एका ब्रदर्ससह 2 वॉर्ड बॉय यांचा अहवाल देखील पॉझीटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील 21 जण पॉझीटिव्ह आले असून एका परिचारिकेच्या पतीला देखील लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर उल्हासनगर येथील जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील एका परिचारिकेसह तिच्या पती व 12 वर्षीय मुलीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी ः बॉलिवू़ड हादरलं! आणखी एका अभिनेत्याला कोरोनाची लागण

सर्व कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाची व त्यांच्यावर होणाऱ्या उपचारावर आम्ही लक्ष ठेवून आहे. या कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. 
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona worriors affected by corona, special ward made for them