esakal | राज्यात कोरोनाचा भडका ! दिवसभरात 2000 नव्या रुग्णांची भर, तर इतके जण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये 23, नवी मुंबईमध्ये 8, पुण्यात 8, जळगावमध्ये 3, औरंगाबाद शहरात 2, अहमदनगर जिल्ह्यात 2, नागपूर शहरात 2, भिवंडीत 1; तर पालघरमध्ये एकाचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाचा भडका ! दिवसभरात 2000 नव्या रुग्णांची भर, तर इतके जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज 2033 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 35,058 वर पोहोचली आहे. आज 51 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला; तर 749  रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 8437 करोनारुग्ण बरे झाले आहेत.  

महत्वाची बातमी : सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये 23, नवी मुंबईमध्ये 8, पुण्यात 8, जळगावमध्ये 3, औरंगाबाद शहरात 2, अहमदनगर जिल्ह्यात 2, नागपूर शहरात 2, भिवंडीत 1; तर पालघरमध्ये एकाचा मृत्यू झाला. या शिवाय बिहार राज्यातील 1 मृत्यू मुंबईत झाला आहे. मृतांमध्ये 35  पुरुष; तर 16 महिला आहेत. त्यात 60 वर्षे किंवा त्यावरील 21 रुग्ण आहेत; तर 19 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आहेत. 11 जण 40 वर्षांखालील आहे. त्यातील 35 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, असे अतिजोखमीचे आजार होते.  कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1249 झाली आहे. 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1681 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14,041 सर्वेक्षण पथकांनी 60.47  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. सध्या राज्यात 3,66,242 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 18,678 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

6 जिल्ह्यांमध्ये सर्व्हे 
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आयसीएमआर ) देशातील 21 राज्यातील 69 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सर्व्हे करण्यात येणार आहे.  महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली  या सहा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यामधे मोघम पध्दतीने निवडलेल्या 10 समुहातील प्रत्येकी 40 जणांची अशी एकूण 400 लोकांच्या रक्ताची तपासणी  करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.

Corona's havoc continues 2033 new patients in maharashtra; 51 death