ठाण्यात कोरोनाचा हाहाकार! दिवसभरात विक्रमी रुग्णांची नोंद; अधिक माहितीसाठी वाचा

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 21 May 2020

  • ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर!
  • 24 तासांत 267 रुग्णांची तर, 10 जणांच्या मृत्यूची नोंद

ठाणे :  जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची आकडेवारी दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असून ठाणे पालिका व नवी मुंबई पालिका क्षेत्रात रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी (ता.21) जिल्ह्यात 267 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 10 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 4 हजार 672 वर तर, मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. 

एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

गुरुवारी ठाणे महापालिकाक्षेत्रात 97 कोरोना बाधीतांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांचा आकडा01 हजार 561 वर तर, मृतांचा आकडा 61 वर पोहोचला. नवी मुंबई पालिका क्षेत्रात 58 बाधितांच्या नोंदीसह दोघांच्या  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 1 हजार 422 इतका झाला असून मृतांचा आकडा 47 वर गेला आहे. तर, कल्याण डोंबिवलीत 48 नवे रूग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 642 तर, मृतांचा आकडा 17 झाला आहे. उल्हानगरमध्ये 10 नवीन रुग्णांमुळे बाधितांच आकडा 154 झाला आहे. तसेच मिरा भाईंदरमध्ये 13 नव्या रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 394 तर, मृतांचा आकडा 3 झाला आहे. तसेच भिवंडी पालिका क्षेत्रात 5 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 82 झाला आहे. बदलापूरमध्ये देखील 13 रुग्णांची तसेच एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा 137 तर, मृतांचा आकडा 3 झाला. अंबरनाथमध्ये एका नवीन रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 48 वर गेला. तर, ठाणे ग्रामीण भागात 22 नव्या बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 232 झाला आहे. 
-------------------

महापालिका क्षेत्र         बाधित रुग्ण     मयत
ठाणे महापालिका              97          04
केडीएमसी                      48           02 
नवी मुंबई                        58          02 
मीरा भाईंदर                    13           01
उल्हासनगर                     10          00 
भिवंडी                            05          00 
अंबरनाथ                         01         00 
बदलापूर                        13           01 
ठाणे ग्रामीण                     22           00


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's havoc in Thane district! In 24 hours, 267 patients died and 10 died