esakal | घरातील जेष्ठांची अत्यंत काळजी घ्या! वाचा, काय माहिती आली समोर?
sakal

बोलून बातमी शोधा

घरातील जेष्ठांची अत्यंत काळजी घ्या! वाचा, काय माहिती आली समोर?
  • देशातील 16 कोटी ज्येष्ठांना कोरोनाचा सर्वाधिक धोका 
  • पंतप्रधानांचा काळजी घेण्याचा सल्ला; केंद्र सरकारची नियमावली 

घरातील जेष्ठांची अत्यंत काळजी घ्या! वाचा, काय माहिती आली समोर?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनापासून ज्येष्ठ नागरिकांचा बचाव करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 14) देशाला संबोधित करताना दिला. त्यानुसार, केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची कुटुंबीयांनी कशी काळजी घ्यावी, हे या नियमावलीत सांगण्यात आले आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचे दीर्घकालीन आजार असतील, तर त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाबाधेचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असून, मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 87 टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी आजार होते. 


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभाग व जेरिऍट्रिक मेडिसीन यांनी ही नियमावली तयार केली आहे. देशात सुमारे 16 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्यात 60 ते 69 वर्षे वयोगटातील 8.8 कोटी, 70 ते 79 वयोगटातील 6.4 कोटी आणि 80 वर्षांवरील 2.8 कोटी व्यक्तींचा समावेश आहे. 

यांची काळजी महत्त्वाची 
दीर्घकालीन आजार, श्‍वसनविकार, अस्थमा, सीओपीडी, ब्रॉंकायटिस, टीबी, फुप्फुसाचे विकार, हृदयविकार, हृदय बंद पडणे, किडनीचे आजार, यकृताचे आजार, मेंदूशी संबंधित आजार, पार्किसन्स, मेंदूचा आघात, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग या आजारांमुळे ग्रासलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
 

हे करा 
घरातच राहा, बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळा. 
कोणाला भेटणे गरजेचे असल्यास एक मीटर अंतर ठेवा. 
एका ठिकाणी भेटणे थांबवा. 
घरी राहून योगासने आणि व्यायाम करा. 
अनेकदा 20 सेकंदांपर्यंत हात धुवा. 

लॉकडाऊनच्या काळात मानसिक, शारिरीक स्वास्थ्य चांगले राखणे अत्यंत आवश्‍यक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी त्यांनी कुटुंबीयांसोबत वेळ घालवला पाहिजे, आपल्या आवडी जपल्या पाहिजेत. सतत बातम्या बघणे आणि समाज माध्यमांचा वापर करणे टाळले पाहिजे 
- डॉ. प्रेम नागनाथ, सल्लागार, जेरिऍट्रिक मेडिसीन, जसलोक रुग्णालय

loading image