स्थानिक पातळीवर 'या' टेस्टद्वारे कोरोनावर मात करण्याची तयारी

rapid
rapid

पालघर : कोरोनाची तपासणी स्थानिक पातळीवर रॅपिड टेस्टच्या माध्यमातून होणार असून, रुग्णावर आता तातडीने उपचार करता येणार अशी माहिती नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास मंत्री शिंदे यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी किरण महाजन  आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सर्व खासगी रुग्णालयांना यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य प्रशासनाला कोरोना बाधितांच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य राज्य शासन करत आहे असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा विस्तार जिल्हा स्तरावर करण्यासाठी  प्रयत्न  करू त्याच बरोबर  कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

अफवा पसरविणारांवर कठोर कारवाई
16 एप्रिल रोजी गडचिंचले येथे तीन व्यक्तींची अमानुषपणे हत्या केली होती. हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. जिल्हा  पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि दिवसभरात 100 पेक्षा जास्त लोकांना पकडले, त्यात 9 अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तिघाजणांची हत्या चोर आल्याची अफवा पसरल्यामुळे झाली त्यामुळे अफवा पसरविणाऱ्यांवर देखील कठोरचा इशारा मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

Corona's Rapid Test Locally Information of Minister Eknath Shinde

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com