esakal | कोरोनामुळे शरीराचे कोण-कोणते भाग होऊ शकतात निकामी, जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे शरीराचे कोण-कोणते भाग होऊ शकतात निकामी, जाणून घ्या

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत तब्बल २०००० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनामुळे शरीराचे कोण-कोणते भाग होऊ शकतात निकामी, जाणून घ्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत तब्बल २०००० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात बहुतांश लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत. मात्र तरीही ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर काही कोरोना रुग्णांच्या शरीराचे काही भाग कोरोनामुळे निकामी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

कोरोना रुग्णाच्या शरीरात जाऊन त्यांच्या पेशींमध्ये मिसळतो. तसच रुग्णाच्या श्वसनक्रियेवर हल्ला करतो, त्यामुळे मृत्यू देखील ओढावू शकतो. कोरोनाचा परिणाम शरीराच्या विविध भागांवर होऊ शकतो. ज्यामुळे शरीराचे काही भाग पूर्णपणे निकामी होऊ शकतात. यासंबंधीची माहिती 'द लींसेट'कडून देण्यात आली आहे.

धोक्याची घंटा, नागरिकांनो सावधान ! वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतायत 'मे' महिन्यात कोरोनाचा विस्फोट

कोरोना व्हायरस रक्त पेशींचं कवच म्हणून काम करणाऱ्या एंडोथिलीयमच्या आतमध्ये जाऊ शकतो . ज्यामुळे मानवी शरीराची  रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसंच  तुमच्या फुप्फुसाला अधिक धोका निर्माण होऊन तुमचं फुप्फुस निकामी होऊ शकतं.

कोरोनामुळे शरीराच्या इतर भागांमधला रक्त पुरवठा कमी होऊ शकतो. ज्याचा परिणाम तुमची किडनी, हृदय आणि आतड्यांवर  होऊ शकतो. ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर, डायबिटीज असे काही आजार आहेत त्यांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका असतो.

धारावीनंतरच्या 'या' सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोना रोखण्याचं आव्हान, पण..

तुमच्या शरीरातल्या रक्त वाहिन्यांमध्ये हा व्हायरस मोठ्या  प्रमाणावर जाऊ शकतो.ज्यामुळे तुमच्या शरीराचे  अनेक अंग खराब होऊ शकतात. तसंच अनेक रुग्णांना हायपर टेन्शन सारखा आजार किंवा काही मानसिक आजार असतात. अशा रुग्णांनाही कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो.

त्यामुळे जर तुम्हालाही कुठला आजार असेल तर तुमच्या प्रकृतीला जपणं ही तुमची जबाबदारी आहे.

which parts of the human body can be affected by corona read full report

loading image