'या' कारणानं यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा होणार कोरोना चाचणी

'या' कारणानं यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा होणार कोरोना चाचणी

मुंबई: विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा दिवस होणार आहे. 

अधिवेशन दहा दिवस होत असल्यामुळे दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.  पाच दिवस कामकाज पुन्हा एकदा कोरोना चाचणी होईल. जेणेकरून या पाच दिवसात कोणी कोरोना बाधित झाले तर स्पष्ट व्हावे, यासाठी दोन वेळा चाचणी करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10  मार्च असे दहा दिवस होत आहे.   8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्चला बजेटवर चर्चा होणार आहे. त्यासाठी आज आणि उद्या चाचणी होणार आहे. 

आठ मार्च ते दहा मार्च कामकाजसाठी सहा आणि सात मार्च रोजी दुसरी कोरोना चाचणी होईल, अशी माहिती मिळाली आहे. 

 coronavirus maharashra budget session 10 days covid 19 test taken two times

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com