esakal | क्वॉरंटाईनचा शिक्का घेऊन घराबाहेर जाल तर तुरंगाची हवा खाल! BMC ची कडक नियमावली जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

क्वॉरंटाईनचा शिक्का घेऊन घराबाहेर जाल तर तुरंगाची हवा खाल! BMC ची कडक नियमावली जाहीर

कोविडची लक्षणं नसलेल्या रुग्णांना त्यांच्या घरात सुविधा असल्यास घरी विलगीकरणात राहाण्याची सुविधा देण्यात येणार आहे.त्यांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येणार आहे

क्वॉरंटाईनचा शिक्का घेऊन घराबाहेर जाल तर तुरंगाची हवा खाल! BMC ची कडक नियमावली जाहीर

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : कोविडची लक्षणं नसलेल्या रुग्णांना त्यांच्या घरात सुविधा असल्यास घरी विलगीकरणात राहाण्याची सुविधा देण्यात येणार आहे.त्यांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येणार आहे.मात्र,नजर चुकवून घरा बाहेर पडल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी आज कोविड परीस्थीतीचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी लक्षण विरहीत रुग्णांना तत्काळ संस्थात्मक किंवा घरात विलगीकरण करावे.मात्र,घरात विलगीकरण करताना त्यांच्या हातावर छिक्के मारावे.तसेच,दिवसातून किमान चार ते पाच वेळा त्यांना पालिकेच्या वॉर रुम मधून संपर्क साधावा.शक्यतो लॅन्डलाईनवर संपर्क साधावा.अशात जर संबंधीत व्यक्ती घराबाहेर पडत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करा असे आदेश आयुक्तांनी दिले आहे.तसेच,हायरीस्क व्यक्तींनाही विलगीकरणातून बाहेर पडता येणार नाही.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

खाटांचे नियंत्रण वॉर रुम मधून
कोविड शिखरावर असताना रुग्णांना आवश्‍यक खाटांचे नियोजन पालिकेच्या वॉर रुम मार्फत केले जात होते.आताही याच पध्दतीने खाटांचे नियोजन करावे.त्यासाठी रुग्णालयांनीही नियमीत माहिती प्रभागाच्या वॉर रुमला कळवावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

---------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

coronavirus marathi news quarantine stamp out off home prison BMC announces strict rules mumbai latest updates