esakal | कोरोनाच्या नव्या स्ट्रेन 'सी.1.2' वर मंथन सुरू; सतर्क राहण्याचा टास्क फोर्सचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Corona new strain

कोरोनाच्या नव्या स्ट्रेन 'सी.1.2' वर मंथन सुरू; सतर्क राहण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : जागतिक महामारी कोरोना विषाणू (corona virus) वेळोवेळी नवीन स्वरूपात (new variants) समोर येत आहे. अल्फा, डेल्टा आणि डेल्टा प्लस अशी अनेक रूपे आतापर्यंत समोर आले आहेत. आता या श्रुंखलेत आणखी एका नावाची भर पडली आहे. एका अभ्यासात कोरोनाचा नवीन स्ट्रेन 'सी.1.2' (new strain) सापडला आहे. कोरोनाचे हे रूप दक्षिण आफ्रिका (south Africa) आणि जागतिक स्तरावर इतर अनेक देशांमध्ये आढळले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, असे मानले जात आहे की, आतापर्यंत समोर आलेल्या सर्व कोविड -19 प्रकारांपेक्षा हा अधिक धोकादायक (dangerous virus) सिद्ध होऊ शकतो. सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात याचा एकही रुग्ण नाही. यानंतरही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेला 'बॅंको' पुरस्कार

याबाबत, राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी नागरिकांना सुरक्षित आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेशनल डिसीजेस (एनआयसीडी) आणि दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू-नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेंसींग प्लॅटफॉर्म (केआरआयएसपी) च्या शास्त्रज्ञांनी नुकताच एक अभ्यास केला. यामध्ये, मे महिन्यात पहिल्यांदा कोरोनाचे सी.1.2 रूप सापडले होते. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेत आढळला. तेव्हापासून तो वेगाने इतर देशांमध्ये पसरले आहे. हा स्ट्रेन चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्येही कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये आढळला आहे.

दरम्यान, आता याबाबत मुंबईत विचारमंथन सुरू झाले आहे. आतापर्यंत डेल्टा आणि डेल्टा प्लसची रुग्ण मुंबईत सापडले आहेत. मुंबईत डेल्टा प्लसचे 11 रुग्ण आहेत तर, डेल्टा व्हेरियंटचे बरेचसे रुग्ण आहेत. अलीकडेच, मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात 184 नमुन्यांवर झालेल्या जीनोम सिक्वेंसींगमध्ये 128 डेल्टा केसेस आढळले. उर्वरित नमुन्यांमध्ये सी.1.2 स्ट्रेनचा एकही रुग्ण आढळला नाही. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, सध्या मुंबई किंवा महाराष्ट्रात या स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही परंतु त्याची तीव्रता इतर स्ट्रेनपेक्षा जास्त आहे. हा वेगाने पसरतो. त्यामुळे, आतापासून सुरक्षित आणि सावध राहण्याची गरज आहे.

"सध्या हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. त्याचा मुंबईसह महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. अभ्यासात असे आढळून आले आहे की आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनपैकी हे सी.1.2 हे नवीन रूप सर्वात घातक आहे  त्यामुळे याबाबतीत सावध राहणे गरजेचे आहे."

डॉ. गौतम भन्साळी, कोविड टास्क फोर्स सदस्य

loading image
go to top