esakal | ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेला 'बॅंको' पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Banko Award

ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेला 'बॅंको' पुरस्कार

sakal_logo
By
संदीप पंडीत

विरार : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अग्रगण्य समजला जाणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला (Thane District Bank) बॅंकींग क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा बॅंको ब्ल्यू रिबन अर्थात बॅंको पुरस्कार (Banko Award) मिळाला आहे. हा पुरस्कार सोहळा कर्नाटकातील (karnatak) म्हैसूर येथे बुधवारी पार पडला . सोहळ्यात म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा (Pratap Sinha) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. बॅंकेच्यावतीने हा पुरस्कार अध्यक्ष राजेंद्र पाटील (rajendra patil) यांनी स्वीकारला.

हेही वाचा: आरोपी सुधा भारद्वाज यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करा- हायकोर्ट

देशातील बॅंकांच्या सहा हजार ते आठ हजार कोटींच्या ठेवींच्या श्रेणीमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अव्वल ठरली आहे. त्यामुळे देशातील प्रथम क्रमांकाचा बॅंको पुरस्कार जिल्हा बॅंकेला मिळाला आहे. सहकार क्षेत्रात ठणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके नावाजलेली बॅंक असून बॅंकेच्या गुणवत्तापूर्ण कामामुळे बॅंकेला आजवर सहावेळा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सहावेळा बॅंको पुरस्कार मिळवणारी ठाणे जिल्हा सहकारी बॅंक ही एकमेव बॅंक ठरली आहे. शेतकऱ्यांची बॅंक असा लौकिक असलेल्या या बॅंकेने शेतकऱ्यांच्या आणि ठेवीदारांच्या अनेक योजना राबविल्या आहेत. आपल्या सुलभ कारभारामुळे बॅंकेचे शेतकरी आणि ठेवीदारांशी विश्वासाचे नाते जोडले गेले आहे.

बॅंकेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याला अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक नीलेश भोईर, अनिल मुंबईकर, जगन्नाथ चौधरी, इंद्रजित पडवळ, निवृत्ती घुसेकर, बाबुराव दिघा, लक्ष्मण डोंबरे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे हे उपस्थित होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सातत्याने गुणवत्तापूर्ण काम करण्याचा प्रयत्न करते आहे. शेतकरी आणि ठेवीदारांसह सभासदांना चांगली सेवा देत सातत्याने वेगवेगळे पुरस्कार मिळवत असल्याने ही आमच्या कामाची पोचपावतीच आहे. निष्ठापुर्वक केलेल्या कामामुळे बॅंकेला मिळणारे पुरस्कार हे आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आहे. असे प्रतिपादन या सोहळ्यानंतर बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले.

loading image
go to top