...तर इमारच होणार सील; मुंबई महापालिकेने नवी नियमावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

...तर इमारच होणार सील; मुंबई महापालिकेने नवी नियमावली

मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा (coronavirus) आकडा चांगलाच वाढत चालला आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यामुळे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नवी नियमावली जाहीर केली आहे. एका इमारतीत दहा कोरोनाबाधित आढळल्यास इमारतच सील (building will be sealed) करण्यात येणार आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या मागील काही दिवसांपासून चांगलीच वाढू लागली आहे. मुंबईत आज आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाला चिंता वाटू लागली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इमारतीबाबत नवीन नियमावली (new rules) जाहीर करण्यात आली आहे. एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळला तर तो मजला सील करण्यात येणार आहे. इमारतीत दहा पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील केली (building will be sealed) जाणार आहे.

हेही वाचा: पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असुरक्षित! हिंदू व्यावसायिकाची हत्या

१४ दिवस क्वारंटाईन

कोरोनाचे रुग्ण वाढलेल्या मजल्याच्या खालील व वरील मजल्यावरील सर्व रहिवाशांना कोरोना चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करावी लागेल. आरटीपीसीआर टेस्ट होईपर्यंत इमारत उघडण्यात येणार नाही किंवा अशा इमारतीस सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. रहिवासी आरटीपीआर टेस्ट करत नाही तोपर्यंत इमारत उघडली जाणार नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top