esakal | Coronavirus : 'फक्त निम्म्याच कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवा'
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : 'फक्त निम्म्याच कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवा'

कोरोना बाधितांची संख्या 39 वर

- बँकिंग, टेलिफोन सेवा वगळल्या

Coronavirus : 'फक्त निम्म्याच कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवा'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातील विविध राज्यात याची लागण झालेले अनेक रुग्ण आढळत आहे. या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची खबरदारी म्हणून विविध शाळांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आता खासगी कंपन्यांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार, विविध मॉल्स्, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आता महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खासगी कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांच्या फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवावे आणि इतर कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची परवानगी द्यावी, असे आदेश देण्यात आले आहे. 

तसेच संबंधित कार्यालयाने या आदेशाचे पालन केले नाहीतर अशांवर कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

बँकिंग, टेलिफोन सेवा वगळल्या

प्रशासनाने कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले असले तरी बँकिंग, टेलिफोन, इंटरनेट, रेल्वे, वाहतूक, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स, फूड मार्केटसारख्या अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.

Coronavirus: साथीच्या रोगांमुळे जागतिक अर्थव्यवस्था होते डळमळीत; ३७ लाख कोटींचे वार्षिक नुकसान

कोरोनाबाधितांची संख्या 39 वर

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे.