चिंताजनक! मुंबईतील मृत्यूंच्या संख्येत पुन्हा वाढ

रूग्णवाढीचा दर कमीच; दिवसभरात 788 नवीन रुग्ण
Corona
Coronaesakal
  • रूग्णवाढीचा दर कमीच; दिवसभरात 788 नवीन रुग्ण

मुंबई: शहराचा मृत्यूदर नियंत्रणात आलाय असं दिसत असतानाच गेल्या २४ तासातील मुंबईचा मृत्यूदर पुन्हा वाढला. मंगळवारी केवळ 7 जणांचा मृत्यू झाला होता पण कालच्या दिवसभरात 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 100 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 15 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 19 पुरुष तर 8 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांचे वय 40 वर्षाच्या खाली होते. 8 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 14 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. (Corona virus Updates in Mumbai Bad News for Mumbaikars as Covid Infected Deaths in 24 hours increased)

Corona
मुंबईत मालाडमध्ये इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू

मुंबईत आज 788 नवीन रुग्ण सापडले तर 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,13,790 इतकी झाली आहे.आज 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,80,520 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 65,09,573 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.12 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 553 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 15,947 हजारांवर आला आहे.

Corona
महापौर मॅडम, आम्ही आमचं काम चोख करतो; 'रेल्वे'चं सडेतोड उत्तर

मुंबईत 28 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 62 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 9,230 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 840 करण्यात आले.

Corona
'भरून दाखवलं'... भाजप नेत्याचा शिवसेनेला सणसणीत टोला

धारावीत 4 तर दादरमध्ये 16 नवे रूग्ण

धारावीत आज 4 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 6848 झाली आहे. दादर मध्ये 16 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा 9522 वर पोचला आहे. तर माहीम मध्ये आज 3 नवे रुग्ण सापडले असुन एकूण रुग्ण 9840 झाले आहेत. जी उत्तर मध्ये आज 23 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,210 झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com