Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

'भरून दाखवलं'... भाजप नेत्याचा शिवसेनेला सणसणीत टोला

पहिल्या पावसातच मुंबई पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल
  • पहिल्या पावसातच मुंबई पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल

मुंबई: "पुन्हा एकदा मुंबईची तुंबई (Mumbai Water-logged) झाली. मुंबईत पाणी भरून दाखवलं", अशा शब्दात भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेना (Shivsena) यांना सणसणीत टोला (Criticize) लगावला. मुंबईसह उपनगरात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येणार हे माहित असूनही आणि हवामान विभागाने मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall Forecast) अंदाज व्यक्त केल्यानंतरही पालिकेने (Mumbai BMC) योग्य ती खबरदारी घेतली नाही. याचाच फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला आहे असा आरोपही दरेकर यांनी केला. (Mumbai Bmc Shivsena trolled by Opposition Leader Pravin Darekar over Mumbai Rains)

Uddhav-Thackeray
सचिन वाझे अन् मुंबईचा पाऊस; भाजप नेत्याच्या ट्विटची चर्चा

"मुंबईत शिवसेनेने पाणी भरून दाखवलं आणि पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. गेल्या वर्षी शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी असं सांगितलं होतं की पुढील वर्षी जर पाणी भरलं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील. आता त्यांनी सांगावं की मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री की मुंबई महापालिका? पाणी भरण्यामागे नियोजनाचं अपयश ही मुख्य गोष्ट आहे. नियोजित प्रकल्पांची कामं पूर्ण झालेली नाहीत", असं रोखठोक मत त्यांनी मांडलं.

Uddhav-Thackeray
'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका

भरती आणि मुसळाधार पावसामुळे मुंबई तुंबली असं सांगितलं जातंय. या गोष्टी मुंबईसाठी नवीन नाहीत. गेली २० ते २५ वर्षे मुंबई भरती आणि मुसळधार पाऊस पडतोय. आता हवामान खात्यानेही अलर्ट दिला आहे. त्यामुळे किमान आतातरी मुंबई महापालिकेने त्वरित गतिमान कार्यशैली वापरावी आणि तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करावी आणि जनजीवन सुरळीत करावं", अशी मागणी त्यांनी केली.

Uddhav-Thackeray
पहिल्या पावसाचा लोकलला फटका; ट्रेन्स बंद, रस्त्यांवरही पाणी

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com