esakal | चांगली बातमी! मुंबईत रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ

बोलून बातमी शोधा

Corona Patients
चांगली बातमी! मुंबईत रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ
sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : मुंबईमध्ये कोरोना (covid-19) रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. सोमवारी 2 हजार 662 नवे रुग्ण सापडले. तर नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट म्हणजे 5 हजार 746 रुग्ण बरे झाले असून रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचे दिसते. (coronavirus-updates-mumbai-new-cases-corona-patients-decreased)

सोमवारी 2 हजार 662 नवीन रुग्ण सापडले असून कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या 6,58,866 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 54,143 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.61 पर्यंत खाली आला आहे.

हेही वाचा: 45 वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण; घेता येणार कोविडचा दुसरा डोस

मुंबईत आतापर्यंत 55,13,783 कोरोना चाचण्या (covid-19 test) करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.61 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 111 दिवसांवर आला आहे. 

मुंबईत सोमवारी दिवसभरात 78 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 408  वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 50 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 52 पुरुष तर 26 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  20 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 53 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत गुरुवारी 5746 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5,89,619 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 54,143 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.  मुंबईत 93 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 814 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 20,477 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड (covid-19) काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 888 करण्यात आले.  

धारावीतील 18 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत आज 18 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6515 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 26 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8965 झाली आहे. माहीम मध्ये 46 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9083 इतके रुग्ण झाले आहेत.मुंबई प्रमाणे जी उत्तर मधील रुग्णसंख्या देखील  कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 90 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24,563 झाली आहे.

संपादन : शर्वरी जोशी