मुंबईत ३ महिन्यांसाठी कोरोना योद्धांची भरती, असा दाखल करा अर्ज

पूजा विचारे
Tuesday, 21 July 2020

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोरोना व्हायरस(कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कोविड उपचार केंद्रे तसेच विविध रुग्णालये येथे पॅरामेडिकल संवर्गातील कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्यांच्या कालावधीसाठी ठोक मानधन तत्त्वावर भरती होत आहे.

मुंबईः कोरोना व्हायरसनं कहर माजला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. आता याच दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोरोना व्हायरस(कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कोविड उपचार केंद्रे तसेच विविध रुग्णालये येथे पॅरामेडिकल संवर्गातील कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्यांच्या कालावधीसाठी ठोक मानधन तत्त्वावर भरती होत आहे. एकूण २०३ विविध पदांसाठी ही भरती होत असून यासाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

नोकरीसाठी पात्रता जाणून घ्या 

 • एकूण रिक्त पदे 203
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 51 पदे. पात्रता- बी.एस्सी. + डीएम्एल्टी उत्तीर्ण किंवा 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिनमधील पदवी उत्तीर्ण.
 • क्ष-किरण तंत्रज्ञ- 52 पदे. पात्रता- 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमधील पदवी उत्तीर्ण किंवा बी.एस्सी. + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा 12 वी (विज्ञान/टउश्उ) + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा अनुभव.
 • ई.सी.जी. तंत्रज्ञ- 39 पदे. पात्रता- 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजीमधील 3 1/2 वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण.
 • औषध निर्माता- 61 पदे. पात्रता- डी.फार्म./बी.फार्म. (उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणीकृत असावा.)
 • वयोमर्यादा – दि. 1 जुलै 2020 रोजी 18 ते 50 वर्षे.
 • वेतन – सर्व पदांकरिता ठोक मानधन रु. 30,000/- प्रतीमाह.
 • निवड पद्धती – उमेदवारांनी अंतिम वर्षाच्या पदवी/पदविका परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार निवड केली जाईल. (पदविका/पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांमधून प्रत्येक प्रयत्नासाठी 10 गुण वजा केले जातील.)
 • अर्जाचा विहीत नमुना –  https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत उपलब्ध आहे.
 • अर्ज व्यक्तिश: सादर करण्याचे ठिकाण : ‘प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, सातवा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर. के. पारकर मार्ग, बांद्रा (प.), मुंबई – 400 050’.
 • उमेदवारांनी आपले अर्ज व्यक्तिश- अथवा ई-मेलद्वारे कागदपत्रांच्या/गुणपत्रिकांच्या/प्रमाणपत्रांच्या स्कॅन कॉपीसह दि. 24 जुलै 2020  संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत ao03cms.ph@mcgm.gov.in या ई-मेल आयडीवर अपलोड करावेत.

coronavirus warriors recruitment mumbai bmc vacancies how apply  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus warriors recruitment mumbai bmc vacancies how apply