फोर्ट येथील हिमालय पुल बांधण्यासाठी BMCकडून लवकरच निवीदा

समीर सुर्वे
Saturday, 24 October 2020

फोर्ट येथील हिमालय पुल बांधण्यासाठी महानगर पालिका लवकरच निवीदा जाहीर करणार आहे

मुंबई : फोर्ट येथील हिमालय पुल बांधण्यासाठी महानगर पालिका लवकरच निवीदा जाहीर करणार आहे.येत्या वर्षा पासून कामला सुरवात करुन वर्षाअखेर पर्यंत हे काम पुर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

फेक 'टीआरपी' प्रकरण! गुन्हेशाखेच्या पोलिसांकडून आणखी एकाला अटक

महापालिका मुख्यालया शेजारील बद्रुद्दीन तैयब्बजी मार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जोडणारा हा पुल मार्च 2019 मध्ये कोसळून सात जणांचा मृत्यू आणि 30 जणं जखमी झाले होते.या प्रकरणी पालिकेने केलेल्या चौकशीत काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.तर,पुलावरील भार वाढल्याने हा पुल पडला असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला होता.तब्बल दिड वर्षांनी आता नवा पुल उभारण्याच्या हालचाली पालिकेने सुरु केल्या आहे.
या पुलाच्या उभारण्यासाठी सुमारे 6 कोटी 50 लाखा पर्यंतचा खर्च येणार आहे.तर,जानेवारी फेब्रुवारी पर्यंत प्राथमिक कामे सुरु होऊन 2021च्या डिसेंबर अखेर पर्यंत काम पुर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर; बीकॉमसह 20 परीक्षांचा समावेश

हा पुल हेरिटेज परीसरात असल्याने पालिकेला मुंबई वारसा जतन समितीचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.सध्या जुन्या पुलाच्या पायऱ्या अस्तीत्वात आहे.त्या पायऱ्या पाडून पुर्वी पेक्षा अधिक उंचीचा आणि खुला पुल बांधण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporation to tender for construction of Himalayan Bridge at Fort soon