esakal | कोस्टल रोडचा अवघड टप्पा पूर्ण; दहा टक्के पार्किंग क्षमता वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

Costal Road

कोस्टल रोडचा अवघड टप्पा पूर्ण; दहा टक्के पार्किंग क्षमता वाढणार

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुंबईत (mumbai) वाहनांच्या तुलनेने सार्वजनिक वाहनतळांची (Public parking) संख्या नगण्य आहे. लाखो वाहनांसाठी (vehicles) अवघे 20 हजार पार्किंग सार्वजनिक ठिकाणी मुंबईत उपलब्ध आहेत. मात्र, वरळी ते नरिमन पाईंट (worli to Nariman point) सागरी किनारी मार्ग (seaside road) पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील पार्किंगची क्षमता 10 टक्क्यांनी वाढणार आहे. कोस्टल रोडचा मलबार हिल (malabar hill) टेकडी खालून जाणार बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा या मार्गाचा सर्वात अवघड टप्पा मानला जात होता. आतापर्यंत या संपूर्ण प्रकल्पाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: काँग्रेसच ठाकरे सरकार विरोधात!

महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज याबाबत माहिती दिली.या 12 हजार 700 कोटी रुपयांंच्या प्रकल्पाचे काम 24 तास अविरत सुरु आहे. या प्रकल्पासाठी प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत बांधण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम 1 किलोमिटरचे काम पूर्ण झाले असून आता फक्त 900 मिटरचे काम बाकी आहे.यात,मलबार हिल टेकडी खालून जाणारा बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मुंबईतील वाहानांची संख्या 35 लाखाहून अधिक आहे.मात्र,सार्वजनिक वाहानतळांची संख्या अपुरी आहे.महानगर पालिकेच्या नोंदी नुसार मुंबईत 20 ते 22 हजार वाहाने उभी करण्याची सार्वजनिक व्यवस्था आहे.कोस्टल रोडच्या कामामुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग वाढणाराच आहे.त्याच बरोबर वाहानांच्या पार्किंगमध्येही भर पडणार आहे.कोस्टल रोडसाठी 111 किनारी भागात भरणी टाकण्यात येत येणार आहे.त्या ठिकाणी वाहानतळे उभारण्यात येणार असून सर्व वाहानतळांची मिळून 1 हजार 852 वाहाने उभी करण्याची क्षमता असेल.असेही सांगण्यात आले.

40 फुट व्यासाचा बोगदा

संपुर्ण बोगदा 2.7 मिटरचा असून असे दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. हा 40 फुट व्यासाचा हा बोगदा आहे. म्हणजे साधारण चार मजली इमारतीच्या आकाराचा हा बोगदा बांधण्यात येत आहे.यात,प्रत्यक्ष बोगदा 1.9 किलोमिटर लांबीचा असून उर्वरीत भागात बोगद्यात जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी रॅम्प असेल.अशा प्रकारे समुद्रा खालून जाणारा हा भारतातील पहिलाचा बोगदा असल्याचे सांगण्यात आले.

125 एकर उद्यान

रस्ता बांधण्यासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरणीतच उद्यान तयार करण्यात येणार आहे. साधारण सर्व उद्याने मिळून 125 एकर क्षेत्रफळाच असेल. तसेच,समुद्राच्या बाजूने जॉगिंग ट्रॅकही आहे.

loading image
go to top