विनोदी कलाकार भारतीसह पतीला न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार 

अनिश पाटील
Sunday, 22 November 2020

गांजा सेवनप्रकरणी अटक केलेली विनोदी कलाकार भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना किल्ला (एक्‍सप्लेनेट) न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

मुंबई ः गांजा सेवनप्रकरणी अटक केलेली विनोदी कलाकार भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना किल्ला (एक्‍सप्लेनेट) न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला असून, त्यासाठी सोमवारी (ता. 23) सुनावणी होणार आहे. 

हेही वाचा - खरेदी कक्षातील अधिकाऱ्यांमुळे कोट्यवधीची बिले थकली! औषध वितरकांचा आरोप

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) विनोदी कलाकार भारती सिंहच्या घरावर शनिवारी (ता. 21) छापा टाकला. त्या वेळी तिच्या घरात अमली पदार्थ सापडल्याने एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्षने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला एनपीडीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या वेळी भारतीची चार तास, तर हर्षची तब्बल 15 तास एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा टाकला.

कारवाईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकाला अटक केली. त्याच्याकडून 15 एलएसडी डॉट्‌स, 40 ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून आलेल्या माहितीवरून शनिवारी सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती सिंहच्या घरी व कार्यालयात छापा टाकला. या वेळी केलेल्या झाडाझडतीत 86.5 ग्रॅम गांजा सापडला. त्यानंतर दोघांना एनसीबी कार्यालयात नेले. त्यानंतर भारती आणि हर्ष यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला एनपीडीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

हेही वाचा - इश्‍यू व स्टार्ट कार्यप्रणाली वापरा! एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रकांना आदेश 

आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. भारतीला भायखळा येथील महिला तुरुंगात; तर हर्षला नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात ठेवले आहे.

Court custody of husband along with comedian Bharti The bail application will be heard on Monday

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court custody of husband along with comedian Bharti The bail application will be heard on Monday