ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

ड्रग्जविक्रेती असल्याच्या आरोपात गुन्हा नोंदविलेल्या बेबी पाटणकर ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केलेल्या पाच पोलिस अधिकाऱ्यांना आज सत्र न्यायालयाने दिलासा दिला. या पोलिसांना खटल्यामध्ये क्‍लिन चिट देत असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे.

मुंबई : ड्रग्जविक्रेती असल्याच्या आरोपात गुन्हा नोंदविलेल्या बेबी पाटणकर ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केलेल्या पाच पोलिस अधिकाऱ्यांना आज सत्र न्यायालयाने दिलासा दिला. या पोलिसांना खटल्यामध्ये क्‍लिन चिट देत असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांच्या अमंलीपदार्थ विरोधी पथकामध्ये कार्यरत असलेल्या पाच पोलिसांविरोधात सन 2015 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले, पोलिस निरीक्षक गौतम गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर सारंग, ज्योतीराव माने आणि मुख्य अंमलदार यशवंत पराते यांचा समावेश आहे.

पाटणकरला ड्रग्ज रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाटणकर आणि अन्य एक आरोपी धर्मराज काळोखेला या खटल्यात प्रमुखा आरोपी आहेत. मरिन लाईन्स पोलिस स्थानकामध्ये मुख्य अमंलदार असलेल्या काळोखेच्या लॉकरमधून सुमारे 12 किलोचा मेफेड्रेन हे अमंलपदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. बहुतांश वेळा रेव्ह पार्टीमध्ये हे ड्रग्ज वापरले जाते. पोलिसांच्या अहवालामुळे पाचही पोलिस आरोपींना दिलासा मिळाला आहे. यामधील गोखले यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या दिवशीच अटक करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court gives relief to police officers arrested in drug racket