कोर्टात रंगणार कंगना विरुद्ध राऊत सामना, संजय राऊतांना प्रतिवादी करण्यास परवानगी

कोर्टात रंगणार कंगना विरुद्ध राऊत सामना, संजय राऊतांना प्रतिवादी करण्यास परवानगी

मुंबई, ता. 22 : अभिनेत्री कंगनाच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामासंबंधित याचिकेत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिली. राऊत यांनी दिलेल्या कथित इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई केली, असा दावा कंगनाने केला आहे. यामुळे कंगना विरुद्ध राऊत सामना आता न्यायालयात रंगणार आहे.

न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सुनावणी झाली. कंगनाच्यावतीने ऍडव्होकेट बीरेंद्र सराफ यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांचा एक व्हिडीओ न्यायालयात दाखल केला. यामध्ये कंगनाच्या पीओके संबंधित विधानाबाबत टिप्पणी करण्यात आली आहे. तीला (उखाड दिया) इशारा दिला आहे, असे सराफ यांनी सांगितले.

जर व्हिडीओवरून आरोप करायचे असतील तर त्यासाठी संबंधित व्यक्तीचीही बाजू ऐकणे आवश्यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तसेच एच प्रभागचे महापालिका अधिकारी भगवान लाटे यांंच्यावरही कंगनाने व्यक्तीशः आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रतिवादी करण्याची परवानगी खंडपीठाने दिली.

कंगनासह अन्य काहीजणांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्येफॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासह अन्य काही जणांचा समावेश आहे. या व्यक्तींना किती दिवसाची मुदत दिली होती आणि त्यांच्यावर काय कारवाई केली, असे न्यायालयाने महापालिकेला विचारले आहे.

कंगनाने नवीन मुद्दे याचिकेत नमूद केले आहेत. त्यावर लेखी खुलासा करण्यासाठी गुरुवारपर्यंत अवधी देण्याची मागणी ऍडव्होकेट एसपी चिनॉय यांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली. कंगनाने याचिकेत म्हटले आहे की, बंगल्यात काही वर्षापूर्वी बदल केले होते. मात्र आता म्हणते की बदलच केले नाही. यामुळे तीच्या विधानात विसंगती आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. कंगनाची याचिका दंडासह फेटाळण्याची मागणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. तर कंगनानेही महापालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

court grants permission to make sanjay raut as defendant in bmc vs kangana case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com