esakal | जामीन अर्ज रद्द करण्याची ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली
sakal

बोलून बातमी शोधा

court

जामीन अर्ज रद्द करण्याची ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची ईडीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने आज नामंजूर केली. यामुळे ईडीला चांगलाच झटका बसला आहे. विकासक देशमुख सरनाईक यांचे निकटवर्ती समजले जातात. एनएसईएल (नैशनल स्पौट एक्स्चेंज लिमिटेड) गैरव्यवहार प्रकरणात चालू वर्षी एप्रिल मध्ये ईडीने देशमुख यांना अटक केली होती. त्यांना विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

याविरोधात ईडीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. न्यायालयाने बुधवारी यावर निकाल जाहीर केला. न्यायालयाने ईडिची याचिका नामंजूर केली आणि देशमुख यांचा जामीन कायम ठेवला.

हेही वाचा: मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

सरनाईक यांनी आस्था ग्रुप' या काळ्या यादीतील कंपनीसोबत एनएसईएलमध्ये 250 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपवर ईडीने ठेवला आहे. विहंग आणि आस्था ग्रुप यांना संयक्त विद्यमाने विहंग गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला. यामध्ये विकासक देशमुख यांनी टिटवाळा मध्ये काही जमिनी खरेदी केल्या.

परंतु यामध्ये शेतकऱ्यांना फसविले असा आरोप केला आहे. सन 2014 मध्ये या जमीन व्यवहारात ईडीने मनाई आदेश जारी केले. तरीही चालू वर्षी ही जमीन देशमुख यांनी विक्रला काढली असा आरोप आता ईडीने ठेवला आहे. सरनाईक आणि त्यांच्या मुलांची चौकशी देखील ईडी करत आहे.

loading image
go to top