ठाण्यात केवळ एकच कोविड सेंटर राहणार सुरु, पालिका प्रशासनाचा निर्णय

ठाण्यात केवळ एकच कोविड सेंटर राहणार सुरु, पालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबईः दिवसेंदिवस ठाणे महानगर पालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. असे असतानाही शहरत कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याची दाखल घेत, ठाणे महापालिका प्रशासनाने साकेत येथील ग्लोबल कोविड सेंटर हे एकमेव सेंटर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवार म्हणजेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून केली जाणार आहे. त्यामुळे एकाच छताखाली आता कोरोना रुग्णावर उपचार करण्यात येणार आहे. 

 ठाणे महानगर पालिका हद्दीत मार्च महिन्यापासून शहरात कोरोना महामारीला सुरुवात झाली. जून, जुलै, आगस्ट, सप्टेंबर या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होऊ  लागली आहे. महापालिकेच्या कोविड सेंटर बरोबर खाजगी रुग्णालयांमध्येही कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत होते. 
 
सध्याच्या घडीला 981 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एक हजार 243 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96 टक्क्यांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या, म्हाडा, सिडको, आणि खाजगी मीडियाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यात महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये सध्या एक हजार 300 च्या आसपास बेड्स उपलब्ध आहेत. 

कॅडबरी जवळही १ हजार बेडची सुविधा उपलब्ध आहे. बुश कंपनीच्या ठिकाणी आणि बोरीवडे येथे उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत. कळवा आणि मुंब्य्रातही 810 बेडसचे हॉस्पिटल सुरु आहेत. मात्र ग्लोबल कोविड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला अवघ्या 112 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील 35 ते 40 च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. खाजगी रुग्णालयात देखील अशीच काहीशी रुग्णांची संख्या आहेत. 

दरम्यान मागील काही दिवसापासून कोविड सेंटरवर होणाऱ्या खर्चावरुन पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे आता पालिकेनेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून शहरात महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेले ग्लोबल कोविड सेंटर हेच सुरु राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इतर कोविड सेंटरमध्ये असलेला स्टॉफ या ग्लोबल सेंटरमध्ये वळविण्यात येणार असून उर्वरीत नको असलेला स्टाफ परत पाठविला जाणार आहे. मात्र शहरातील उर्वरित कोविड सेंटर बंद होत असली तरी दुसरी लाट आल्यास ती तत्काळ सुरु करता यावीत म्हणून ती पूर्णपणो बंद केली जाणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. तसेच शहरातील काही खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटरही बंद करण्यात येणार आहेत.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 care center thane only one municipal corporation administration decision

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com