१०० टक्के 'वर्क फ्रॉम होम'ला कॉर्पोरेट सेक्टरचा होकार; CSR फंडातून होणार सरकारला मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज सरकारकडून अत्यंत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील मोठ्या खासगी कंपन्यांच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज पार पडलेल्या बैठकीत फार्मा सेक्टर, बँकिंग सेक्टर, मनोरंजन क्षेत्र यासारख्या विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी आरोग्य मंत्र्यांनी संवाद साधण्यात आल्यात. या बैठकीनंतर कॉर्पोरेट सेक्टर सोबत कोरोनासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असं देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत. 

COVID19 - कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट ! 

राज्यातील सध्याची परिस्थिती संवेदनशील आहे. या सर्व परिस्थितीची माहिती राज्यातील कॉर्पोरेट सेक्टरला देण्यात आली. या बैठकीनंतर कॉर्पोरेट सेक्टरकडून सरकारला सर्वतोपरी सहकार्य केलं जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. कॉर्पोरेट सेक्टर पुढील १५ दिवस आपापले ऑफिसेस पूर्णपणे बंद ठेवणार असल्याचं आश्वासन सरकारला मिळालंय. खासगी क्षेत्रांकडे घरातून काम करण्याचं तंत्रज्ञान आहे, शक्य असेल त्या व्हर्च्यूअल मिटिंगच्या माध्यमातूनकाम केलं जाणार आहे. त्यामुले सर्व ठिकाणी १०० टक्के घरून काम करण्याची मुभा म्हणजेच 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा देण्यात येणार आहे.   

COVID19 -  कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यातील आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे CSR फंडामार्फत सरकारला करण्यात येणारी मदत. खासगी कंपन्या आणि कॉर्पोरेट सेक्टर सरकारला कोरोनाशी दोन हात करण्यास मदत करणार आहे. अशात कॉर्पोरेट कंपन्यांकडू लोकांच्या हितासाठी खासगी कंपन्या जाहिरातींच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत. याचसोबत कोरोनाशी दोन हात करताना मास्कचा पुरवठा, सॅनिटायझरचा पुरवठा, PPE किट आणि औषधं ही पुरवली जाणार आहेत. राज्य सरकारने ८० मत्त्वाच्या औषधांची यादी जारी केलीये. अशात सर्व खासगी कंपन्या आणि कॉर्पोरेट सेक्टरकडून सरकारला मदत केली जाणार आहे. 

covid 19 corporate sector is positive of giving work from home to their employee

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 corporate sector is positive of giving work from home to their employee