esakal | कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाची जगभरात दहशत पसरली आहे. दिवसागणिक जगभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात दिनांक १७ मार्च दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालीये. यातील एका व्यक्तीचा मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झालाय. महाराष्ट्रात १ तर भारतात १७ मार्च दुपारी १२ वाजेपर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. एकंदर जगभरातील आकडेवारी पाहिली तर जगभरात आतापर्यंत तब्ब्ल सात हजार लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत. पण कोरोनाला घाबरून जायची गरज नाही.

#COVID19 - महामुंबई लॉकडाऊनच्या दिशेने...

जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही एकूण पॉझिटिव्ह केसेस च्या तुलनते केवळ ३ टक्के असल्याची माहिती समोर येतेय. म्हणजे प्रत्येक १०० पॉझिटिव्ह केसेसपैकी तिघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आपल्या समोर आहे. अशात तुम्ही म्हणाल की जगभरात एवढ्या लोकांना कोरोना होऊन ते बरे कसे झालेत? कोरोनावर अजूनही कोणताही औषध आलेलं नाही. मग हे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट बरे कसे होतायत बरं? याबद्दलच आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. 

हा विषाणू आहे 'झुनॉटिक' विषाणू : 

आता तुम्ही म्हणालं झुनॉटिक वगैरे म्हणजे  काय  ? तर,  सोप्या भाषेत 'झुनॉटिक' विषाणू म्हणजे प्राण्यांमधून संक्रमण होऊन मानवी शरीरात आलेला विषाणू. 

कोरोना विषाणूच्या हल्ल्यामुळे आपल्याला होतं काय ? 

एका अहवालानुसार कोरोनाचे विषाणू हे आपल्या शरीरात गेल्यावर ते घशामध्ये त्यांच्या कॉलनी म्हणजे त्यांची घरं करतात. घशातून हा कोरोना विषाणू आपल्या फुफ्फुसांवर आक्रमण करतो. म्हणूनच रुग्णाला दम लागणे, श्वसनाचा त्रास होणे यासारख्या गोष्टी सुरु होतात. या पुढील स्टेज म्हणजे कोरोनाचे विषाणू फुफ्फुसांना निकामी करायला सुरवात करतात. कोरोनाच्या आक्रमणामुळे आपल्या फुफ्फुसांना छिद्र पडू शकतात. 

#COVID19 -  कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

मग माणसं बरी कशी होतायत ?  

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या शरीरात अनेक प्रकारचे विषाणू प्रवेश करत असतात. अशात आपल्या शरीरात अशी एक सिस्टीम असते जी बाहेरून आलेल्या विषाणूंना मारून आपल्याला निरोगी ठेवते. ही सिस्टीम म्हणजे आपल्याला शरीरातील पांढऱ्या पेशी. या पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीरातील पोलिस असं आपण म्हणू शकतो. कारण याच पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात जो विषाणू शिरेल त्याला मारण्याचं काम करत असतात.

आपल्याला कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालं की आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी ऍक्टिव्ह होतात. जोपर्यंत या पेशी आपल्या शरीरातील व्हायरसला मारत नाहीत, तोपर्यंत आपल्याला आजारी वाटतं, ताप, सर्दी खोकला आल्यासारखं वाटतं. मात्र औषध न घेता आपल्याला काही दिवसात बरं देखील वाटतं.

ज्या माणसांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे अशी अनेक माणसं कोरोनामधून बाहेर आली आहेत.  कोरोनामुळे आलेला विषाणू हा आपल्या शरीरासाठी अत्यंत नवीन आहे. कारण हा विषाणू 'झुनॉटिक' म्हणजेच प्राण्यांमधून माणसात आलेला असल्याने आपल्या शरीरातील पेशींना यांची ओळख नाहीये. 

#COVID19 -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 

शरीरातील इम्युनिटी वाढवा : 

आपल्या शरीरातील इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवली तर आपल्याला कोरोनाला घाबरायचं कारण नाही. मात्र काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. आपल्याल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात भाज्या आणि फळांचं सेवन वाढावा. जास्त पालेभाज्या खा, व्यायाम करा. आपण स्वतःला सुधृढ ठेवलं तर आपण सहज कोरोनाशी दोन हात करू शकतो.     

check how people are are getting better even after detected as corona positive covid19