मुंबईतील कोविड 19 चा दुप्पट कालावधी सुधारला,  372 दिवसांवर दुप्पट दर

मुंबईतील कोविड 19 चा दुप्पट कालावधी सुधारला,  372 दिवसांवर दुप्पट दर

मुंबई: राज्यात रविवारी 3,314 नवीन कोविड -19 संसर्गाच्या रुग्णांची आणि 66 मृत्यूंची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत 19 लाख19 हजार 550 आणि 49 हजार 255 मृत्यूंची नोंद झाली आहे.

दरम्यान मुंबईत रविवारी 578 नवीन रुग्ण आणि 8 कोविड -19 मृत्यूंची नोंद झाली असून एकूण 2 लाख 90 हजार 914 एवढे पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात 11 हजार 76 मृत्यू झाले आहेत. दरम्यान, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह केसेसचा दुप्पट दर आता वाढून 372 दिवसांवर पोहोचला आहे. तर आठवड्याच्या वाढीचा दर 0.21 टक्क्यांवर गेला आहे.

रविवारी नोंदवलेल्या 66 मृत्यूंपैकी 32 मृत्यू गेल्या 48 तासात आणि गेल्या आठवड्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. उर्वरित 31मृत्यू हे गेल्या आठवड्यापूर्वीचे होते. 31 मृत्यूंपैकी 1 नागपुरातील, 8 वर्धा, 5 नाशिकमधील, 2 औरंगाबादमधील, लातूर, ठाणे आणि वाशिममधील प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, सर्वांसाठी लोकल गाड्या सुरू करण्याचा किंवा शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. हा प्रस्ताव राज्य सरकारकडून यावा लागेल. अजून एक मुद्दा म्हणजे नवीन कोविड 19 स्ट्रेन ओळखणे. सध्या, नवीन स्ट्रेन शोधण्यासाठी आमचे लक्ष ब्रिटन, युरोप, मध्य आणि दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्या प्रवाशांचे अलगीकरण करणे आणि त्यांची चाचणी घेणे यावर लागले आहे.

दरम्यान, राज्यातील कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, नवीन स्ट्रेन सापडल्याचा परिणाम संपूर्णपणे शहर अनलॉक करण्याच्या निर्णयावर होणार नाही. मात्र, नवीन वर्षाच्या दोन आठवड्यानंतर आपल्या सर्वांना तयार राहणे गरजेचे आहे. 

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 Mumbai Updates doubled duration 372 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com