esakal | मुंबईत आणखी ९ तर ठाण्यात आढळला आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत आणखी ९ तर ठाण्यात आढळला आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

नवीन आकडेवारीनुसार ता मुंबई आणि उपनगरात म्हणजेच महामुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५३ वर गेलाय

मुंबईत आणखी ९ तर ठाण्यात आढळला आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चाललाय. अशात आज म्हणजेच २५ मार्च रोजी सकाळी चार आणि संध्याकाळी ५ वाजता आणखी पाच असे एकूण नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत आढळून आलेत. याचसोबत ठाण्यात देखील एका नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. सदर आकडेवारी ही दिनांक २५ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता समोर आलेली आकडेवारी आहे.

नवीन आकडेवारीनुसार मुंबई आणि उपनगरात म्हणजेच महामुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५३ वर गेलाय. तर आज दिवसभरात महाराष्ट्रात नवीन एकूण १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे २५ मार्च संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा १२२ वर गेलाय. 

मोठी बातमी - ​"मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशात गेले काही दिवस कोरोनापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातायत. अशात महाराष्ट्रा मागोमाग संपूर्ण देशभरात आता पुढील २१ दिवस लॉकडाऊन जारी करण्यात आलाय.

देशभरातील डॉक्टर्स आणि पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास आपलं कर्तव्य बजावतायत. अशात परिस्थितीचं गांभीर्य न राखता अजूनही नागरी सोशल डिस्टंसिंग पाळत नसल्याचं समोर येतंय. देशातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी घरात राहून नियमांचं पालन केलं तर आपण या संकटातून बाहेर पडणं सुलभ आणि सोपं होईल हे नक्की.  

covid 19 patient count in mumbai mmr region increased 9 new cases in mumbai and 1 in thane detected

loading image