"मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला काही सूचना देखील केल्यात.

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला काही सूचना देखील केल्यात. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. अनेकांनी घराबाहेर पडत जीवनावश्यक गोष्टी कालच घरी आणून ठेवणं पसंत केलं. म्हणूनच मी आज सकाळी सकाळी तुम्हासर्वांशी संवाद न साधता दुपारी तुमच्याशी बोलायला आलो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. 

कोरोना लॉकडाऊन : अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहतूकदारांसाठी विशेष स्टीकर

कोरोनामुळे आपल्या आयुष्यात काही चांगले बदल      

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा तर दिल्यात, त्याच सोबत कोरोनामुळे आपल्या आयुष्यात काही चांगले बदल देखील झालेत, यावर देखील त्यांनी प्रकाश टाकलाय. अनेक कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र आली आहेत. आपण कामानिमित्त बाहेर असतो, अशात आपण जे गमावलं ते पुन्हा कमावतोय. अनेकांच्या घरात कुटुंबीय कॅरम, पत्ते आणि संगीताचा आनंद घेतायत. 

मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय  : 

अनेक लोकं मला विचारतात , तुम्ही घरी काय करतात. मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय. तुम्ही देखील घरी राहून तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं      

आपल्याकडे मुबलक अन्न धान्य आणि भाजीपाला 

महाराष्ट्रात मुबलक अन्न धान्य आणि भाजीपाला आहे. त्यामुळे घाबरून मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचा साठा करू नका. अन्न धान्य आणि जीवनावश्यक गोष्टींची दुकानं बंद होणार नाहीत. आपल्या घरातील पाळीत प्राणांच्या अन्नाबद्दल देखील काळजी करू नका, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आपलं युद्ध न दिसणाऱ्या विषाणूशी आल्याचं बोलून दाखवलंय. १९७१ च्या युद्धाचं उदाहरण देखील त्यांनी दिलंय. जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी तुम्ही घराबाहेर पडणार असालच तर एकट्याने घराबाहेर जावं, असं देखील मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. आपण घराबाहेर पाऊल टाकलं तर शत्रू घरात येईल असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत. 

लढा कोरोनाशी  : मुंबईच्या दाट लोकवस्तीत राहणारी महिला कोरोनामुक्त; परिसरदेखील आहे कोरोना निगेटिव्ह

कुणाचा पगार कापू नका 

अनेकांचं पोट त्यांच्या हातावर आहे. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अनेक कंपन्यांच्या मालकांशी संवाद साधला. अनेकांनी कोरोनामुळे आपली ऑफिसेस, कारखाने आणि कंपन्या बंद ठेवल्यात. या कठीण परिस्थितीत कुणाचंही वेतन थांबवू नका ही विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीये. 

शेतीशी निगडित सर्वकाही सुरु

राज्यातील शेतीशी निगडित सर्व गोष्टी सुरु आहे. शेती आणि शेती कामाशी निगडित सर्व सुरळीत सुरु आहेत. आपण ही काम थांबवली तर येत्या काळात दुसरं मोठं संकट येईल. दरम्यान आपण हे युद्ध जिंकणारच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी बोलून दाखवला. आज आपण शांत आहोत, मात्र या संकटावर मात करून आपल्याला आजचा गुढीपाडवा साजरा करायचाय असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय. 

maharashtra cm uddhav thackeray spoke to maharashtra on corona and gudhi padawa


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cm uddhav thackeray spoke to maharashtra on corona and gudhi padawa