esakal | आता सॅनिटायझरची कमी अजिबात भासणार नाही, नितीन गडकरींनी दिलेत हे आदेश..

बोलून बातमी शोधा

आता सॅनिटायझरची कमी अजिबात भासणार नाही, नितीन गडकरींनी दिलेत हे आदेश..

भाजप आमदार खासदारांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता सॅनिटायझरची कमी अजिबात भासणार नाही, नितीन गडकरींनी दिलेत हे आदेश..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात चार लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालीये. जगभरात २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावलेत. महाराष्ट्रात त्यासचसोबत देशभरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. अशात प्रशासनाकडून काही निर्देश देण्यात आलेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंग ठेऊन घरात राहण्याचा महत्त्वाचा सल्ला देण्यात येतोय.

मोठी बातमी - आई बाबांच्या आधी 'त्या' अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीने हरवलं कोरोनाला...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हात वारंवार धुतले पाहिजेत असं देखील वारंवार सांगण्यात येतंय. आपल्याला शक्य नसेल तर हॅन्ड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातोय. अशात हॅन्ड सॅनिटायझर चा तुटवडा देखील जाणवतोय. लोकांनी घाबरून जास्त प्रमाणात सॅनिटायझर चा साठा करण्यास सुरवात केलीये. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एक उत्तम कल्पना सुचवली आहे.  

एक महिन्याचे वेतन 

भाजप आमदार खासदारांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी - कोरोनामुळे मुंबईचा दूध पुरवठा होऊ शकतो बंद; जाणून घ्या कारण...

इथेनॉलचे सॅनिटायझर्स तयार करण्याचे गडकरींनी आदेश आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात सुरु झालेला सॅनिटायझर्सचा काळाबाजार त्वरित थांबवण्यासाठी केंद्र सरकार उचलणार आहे. राज्यातील वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांची समिती नेमण्यात आली आहे. हे दोघेही राज्य सरकारच्या संपर्कात आहेत. या दोन्ही मंत्र्यांशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटिल आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यांच्याकडून इथेनॉलपासून सॅनिटायर्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याचसोबत २० लाख गरिबांपर्यंत जेवणाची सोय पोहोचावी याकडे लक्ष देण्यात येणार आहेत.

covid 19 precautions nitin gadakari releases order to make sanitizers with ethenol